MAnoj Jarange- Gunratna Sadavarte Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची आज नांदेडमध्ये शांतता रॅली, शहरातील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी; गुणरत्न सदावर्ते खवळले!

Manoj jarange Patil Rally Nanded: मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून शहरात वाहतूकीचा प्रश्न निर्माण होणार आहे.

Gangappa Pujari

संजय सुर्यवंशी, नांदेड|ता. ८ जुलै २०२४

हिंगोली परभणीनंतर आज नांदेडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीसाठी पाच लाखाहून अधिक मराठा बांधव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड शहरात वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार असून शाळा महाविद्यालयाला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या सुट्टीला गुणरत्न सदावर्ते यांनी कडाडून विरोध केला आहे.

हिंगोली परभणीनंतर आज मनोज जरांगे पाटील यांची नांदेडमध्ये मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली निघणार आहे. या रॅलीमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार असून शहरात वाहतूकीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळेच शाळा महाविद्यालयाला एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु या सुट्टीला वकील गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केला आहे.

विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला कोणतीही रॅली बाधक ठरत असेल तर ती रॅली थांबवा, शिक्षण महत्वाचे आहे, रॅली महत्वाची नाही. रॅलीसाठी, आंदोलनासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणं हे थांबवले पाहिजे. सुट्टी जाहीर करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा. अशी मागणी ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी सभापती, मुख्य सचिव, शिक्षण विभागाकडे केली आहे.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या रॅलीला नांदेड शहरातील राज कॉर्नर येथून 12 वाजता सुरुवात होणार आहे. ही रॅली राज कॉर्नर, वजीराबाद मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत निघणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे या रॅलीचा समारोप होणार असून याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT