Manoj Jarange Patil On Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil On Bhujbal : 'छगन भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती'; भुजबळांच्या बालेकिल्ल्यात जरांगेंचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal : मनोज जरांगें पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. यावेळी मनोज जरांगें पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर टीका केली.

Sandeep Gawade

मनोज जरांगें पाटील यांच्या मराठा आरक्षण शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप होत आहे. समोरोपाच्या दिवशीही जरांगेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्या टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्याच नाशिकमध्ये जावून छगन भुजबळ म्हणजे नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच माझ्या नादी लागला तर जिल्ह्याच्या बाहेर प्रचाराला देखील बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला आहे.

छगन भुजबळ देवेंद्र फडणवीस यांचा भाजप पक्ष देखील संपवून टाकतीस. मात्र तरीही फडणवीस त्यांच्या मागे का आहेत कळत नाही. भुजबळांनी सेना, राष्ट्रवादी संपवली आता भाजपचा नंबर असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. दरम्यान मनोज जरांगें यांचं छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यामध्ये दिमाखात स्वागत झालं. पण त्यांना समता परिषदेच्या विरोधाचा सामनाही करावा लागला. त्यांना काळे झेंडेही दाखवण्यात आले, त्यांचा ताफाही अडवण्यात आल्याची माहिती आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून माझी तब्येत खराब आहे. दोन डॉक्टर माझ्यासोबत आहेत, पण माझं दुखणं डॉक्टरला कळणार नाही. माझं दुखणं बेकार, माझं दुखणं म्हणजे मराठा समाजाला आरक्षण. माझ्या वेदना काहीच नाहीत, इतक्या समाजाच्या आहेत. त्यामुळे जो मराठा आरक्षणाला आडवा आला, त्याला आडवा करणारचं असा इशारा जरांगेंनी दिला आहे. - येवल्याला लागलेला डाग पुसणार आहे, येवला पवित्र करणारच असा निर्धार करत त्यांनी भुजबळांना आव्हान दिलं आहे.

कुणबी आणि मराठा एक आहे. त्यामुळे कोणीही आडलं आलंच तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार आहे. गावागावांतील मराठ्यांनी २९ तारखेला अंतरवलीला या, पाडायचं की उभे करायचं हे २९ तारखेला ठरवू, आपल्याला ओबीसी मधूनच आरक्षण घ्यायचं आहे. अशी संधी पुन्हा येणार नाही. पक्ष आणि नेत्याला बाप मानण्या ऐवजी समाजाला बाप माना. आरक्षण मिळत नाही म्हणून आपली लेकरं मोठी होत नाहीत. सरकारला आपल्याला आरक्षण द्यायचं नाही किंवा भाजपमधले लोक यांना आरक्षण देऊ देत नाही, असं दिसतंय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनोख आंदोलन

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT