छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्रास चरसगांच्या विक्री होत असल्याची तक्रारी वाढल्या होत्या.खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट,माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे,आ.प्रदीप जयस्वाल या नेत्यांनी गणेश महासंघाच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे छत्रपती संभाजी नगर शहरातील पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत.
पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेल्या दुहेरी उड्डाणपूल प्रकल्पाचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यांनी कोनशिला अनावरण करत, वाहनातून प्रत्यक्ष पुलावरून जाऊन पाहणी केली. सप्टेंबर २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या उड्डाण पुलाचे कामाचे भूमिपूजन केले होते. फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या दरम्यान सुमारे २.५ किमीचा हा पुण्यातील सर्वात लांब उड्डाणपूल आहे.
भरधाव वेगात असलेल्या कारने एका स्कुटी चालकाला उडविले आहे. नांदेड शहरातील आयटीआय ते अण्णाभाऊ साठे चौक रस्त्यावर हा अपघात झाला आहे.या अपघातात स्कुटी चालक गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघाताची ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे.
गेटवे ऑफ इंडिया शेजारी उभारण्यात येणाऱ्या प्रवासी जेट्टी प्रकल्पाविरोधातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
नाशिकच्या येवला शहरातील बुरुड गल्लीत असलेल्या सुरेखा पैठणी दुकानात पैठणी खरेदी साठी आलेल्या 2 महिलांनी दुकानदाराला पैठणी दाखवण्यास सांगत त्याला बोलण्यात गुंतवून सुमारे 1 लाख 70 हजार रुपये किमतीच्या महागड्या पैठणीची बेमालूम पद्धतीने पैठणीची चोरी केली असून ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे,पैठणी दाखवत असताना उभ्या असलेल्या महिलेने दुकानदारांची नजर चकवून पैठणी आपल्या अंगावरील साडीत लपवली ही सगळी घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
आज मनोज जरांगे यांची संध्याकाळ चा सुमारास छत्रपती संभाजी राजे यांनी भेट घेतली त्या नंतर त्यानं आपली गाऱ्हाणी मांडण्याकरिता युवकांनी गर्दी केली होती युवकांबरीबर संवाद साधल्या नंतर राजे निघून गेले
खासदार शाहू महाराज छत्रपती यांचे पत्र
गेले ४ दिवस सुरू असलेल्या मनोज जरांगे यांचे मुंबई येथे मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषण सुरू आहे या संदर्भात खासदार श्री शाहू छत्रपती महाराज यांनी पत्राद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली पुण्यात पत्रकार परिषद
कोर्टाने काय म्हटलं ते मी ऐकलं नाही
कायदेशीर मार्ग काढण्याची आमची मानसिकता
राजकीय पोळी भाजणं बंद करा, असं मुख्यमंत्री म्हणाले.
रस्त्यावर जे काही सुरु आहे त्यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली
पुण्यातील सिंहगड रोडवरील पुलाचं आज उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंहगड रोडवरील उद्यान पुलाचं होणार उद्घाटन
पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपुल वाहतुकीसाठी आजपासून होणार खुला
फनटाईम थिएटर ते विठ्ठलवाडी या मार्गावरील २.५ किलोमीटर उड्डाणपूलाच उद्घाटन
उद्घाटनाला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची देखील उपस्थिती
मराठा आरक्षण आंदोलनासाठी परभणीत पहिले मदत कार्यालयाची स्थापना
मदत कार्यालयाच्या माध्यमातून, मुंबई मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांना कुठलीही अडचण आल्यास, तातडीने मदत पोहोचवली जाणार
आंदोलकांच्या कुटुंबीयांनाही या कार्यालयामार्फत मदतीचा हात दिला जाणार
पुण्यात मुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त
पुण्यातील सिंहगड रोड उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार
बंदोबस्तासाठी स्वतः पोलिस आयुक्त अमितेश कुमार रस्त्यावर
काही वेळापूर्वी कार्यक्रमाच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले होते
त्याच पार्श्वभूमीवर सिंहगड रस्त्याकडून राजाराम पुलाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चोख बंदोबस्त
आझाद मैदानात सुरु असलेल्या मराठा आंदोलनाविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज कोर्टात युक्तीवाद झाला. उद्या मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर दुपारी ३ वाजता सुनावणी होणार आहे.
मराठा आंदोलक मुंबईतील चाफेकर बंदू चौकात बसले आहेत
पोलिसांकडून आंदोलकांना उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे
मात्र मराठा आ़दोलक उठण्यास तयार नाहीत
गाणे आणि हालगीच्या तालावर नाचत आहेत
मराठा आंदोलकांमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मोठी गर्दी झाली आहे.
पाचव्या दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर आज चाकरमानी पुन्हा कामावर जाण्यासाठी निघाला आहे.
मात्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील आंदोलकांच्या गर्दी मधून वाट काढताना या चाकरमान्यांना मात्र मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
रेल्वे पोलिसांकडून आंदोलकांना या ठिकाणी थांबू नये अशा सूचना केल्या जात आहेत.
मात्र स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर आंदोलकांसोबत चाकरमान्यांची देखील गर्दी पाहायला मिळत आहे
सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरात डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी
सीएसएमटी स्थानकात मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कॉड पथकाकडून पाहणी सुरू
रुद्रा नावाच्या श्वानाकडून सीएसएमटी स्थानकाची पाहणी
बीडच्या आष्टी तालुक्यातील कडा शहरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कडकडीत बंद.
आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी 25 क्विंटल बुंदी मुंबईच्या दिशेने रवाना.
कडा शहर कडकडीत बंद ठेऊन सरकारचे लक्ष वेधले.
आज कडा बंद, उद्या महाराष्ट्र बंद ठेवायची वेळ येउ देऊ नये सरकारने
मराठा बांधवांच्या संतप्त प्रतिक्रिया.
मराठा आंदोलकांसोबत पोलीस कर्मचाऱ्यांनी जेवण केले
CSMT स्थानक परिसरात मराठा आंदोलकांचे कबड्डी खेळ पाहायला मिळाला
कल्याण गोविंदवाडी बायपास पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कोणत्या दुर्गम भागातील खेडेगावातला नसून कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी असलेल्या महानगरपालिकेतील आहे कल्याण मधील गोविंदवाडी बायपास हा पूल महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्याची दुर्दशा पाहून कल्याण डोंबिवलीत पुन्हा येण्याची हिम्मत कोणताही बाहेरील प्रवासी करणार नाही. रस्त्यांच्या खड्ड्यांवर दरवर्षी करोडो रुपयांचा खर्च करूनही खड्यांची परिस्थिती दिवसंदिवस बिकट होत चालली आहे.
वाशिम शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, हे काम निकृष्ट दर्जाचं होतं असल्याने हा रस्ता चौपदरी होईल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आश्वासन दिलेला
असताना आता हा रस्ता दुपदरी केला जातोय. त्यामुळं काँग्रेसकडून आज शहर पोलीस स्टेशन समोरील वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन करत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. या महामार्गाचे काम दर्जेदार करावं तसेच हा महामार्ग चौपदरीकरण करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनासाठी कोल्हापुरातून मदतीचा हात
मराठा आंदोलकांसाठी कोल्हापूरवरून पाठवण्यात येतोय शिधा
कोल्हापुरातून अन्नधान्य साहित्य घेऊन ट्रक टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना
आंदोलन संपेपर्यंत पुलावरातून आंदोलकांसाठी पाठवण्यात येणारा अन्नधान्याचे साहित्य
जालन्यातील अंतरवाली सराटी येथील सोनिया नगर येथे ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलनाला सुरुवात...
ओबीसी आंदोलक बाबासाहेब बटुळे, बाळासाहेब दखने,विठ्ठल तळेकर श्रीहरी निर्मल यांनी ओबीसी आरक्षण बचाव धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे....
एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे आमरण उपोषण करत आहे तर त्यांच्या मागण्यांना विरोध करत ओबीसी बांधव आंतरवाली सराटी येथे धरणे आंदोलन करत आहे..
सध्या मुंबईच्या आझाद मैदान मध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषण सुरू आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये तळ ठोकून आहे अशाच यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील दिवटी पिंपरी या गावातून मराठा आंदोलकांना खाण्यासाठी पाच ते सहा क्विंटलच्या पुरी आणि ठेचा मुंबई साठी रवाना करण्यात आला. विशेष म्हणजे गावातील लोकांनी लोकवर्गणी करून हे सामाजिक दायित्व दाखविण्याचे कार्य दिवटी पिंपरी येथील गावकऱ्यांसह युवकांनी केले.
मुंबईच्या मंत्रालयाबाहेर मराठा आंदोलकांनी घुसकोरी करण्यास सुरुवात केली आहे.
मंत्रालयाच्या बाजूला असलेला महर्षी कर्वे रोड मराठा आंदोलकांनी वाहतुकीसाठी बंद केला आहे.
मराठा आंदोलकांनी रस्त्याच्या मधोमध बसून रस्ता बंद केला आहे.
मंत्रालयाच्या बाहेर बॅरिकेट लावलेल्या ठिकाणी मराठा आंदोलक जमण्यास सुरुवात झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौज फाटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे.
अमित ठाकरे आज पुण्यात
मानाच्या गणपतीसह इतर मंडळांचे घेणार दर्शन
काही वेळात कसबा गणपती दर्शनाला पोहोचत आहेत
गौरी गणपती चक्क बुलेट वर झाल्या स्वार झाल्याचा देखावा पंढरपूरच्या उपरी गावात साकारण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रभर गौरी गणपतीच्या उत्सवाची धामधुम सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील उपरी गावातील सौ. रत्नमाला कदम यांनी गौराई समोर देखावा केला आहे. या मध्ये गौराईना बुलेट वर बसवले आहे. यामुळे गौराई सुद्धा मॉडर्न झालेल्या देखाव्यातून दिसत आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना मराठा आंदोलनाला बळ मिळावे आणि जरांगेपाटलांची प्रकृती स्थिर राहावी यासाठी रांजणगाव महागणपतीला सकल मराठा समाजाच्या वतीने महाआरती करण्यात आली. आरक्षणाचा लढा यशस्वी व्हावा, अशी सामूहिक प्रार्थना या वेळी करण्यात आली.
Vo :- शिरुर तालुक्यातील रांजणगाव महागणपती येथे सकल मराठा समाजाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला आरक्षणाचा लढा यशस्वी व्हावा यासाठी भाविकांनी महागणपतीला साकडे घातले. या वेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी
सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर
पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न
मराठा आरक्षण मागणीसाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलना पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथून चटणी भाकरी,पाणी बाॅटल अशी मदत पाठवण्यात आली आहे. जवळपास तीन हजार लोकांना पाच दिवस पुरेल इतकं अन्न व जीवना आवश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत. स्थानिक मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत साहित्याचा टेम्पो पाठवला.
खासदार सुप्रिया सुळे आज कसबा गणपती दर्शनाला गेल्या आहेत
पुण्यातील मानाच्या गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन
सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मध्ये मराठा बांधवांची गर्दी
आजचा उपोषणाचा चौथा दिवस असल्यामुळे
मराठा बांधव आझाद मैदानावर दाखल होण्यास सुरुवात
मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे या आंदोलनकर्त्याचे सरकारकडून हाल होत असल्याने हिंगोलीत आज मराठा बांधवांनी सिरसम येथील बाजारपेठ बंद ठेवत निषेध केला आहे दर सोमवारी सिरसम मध्ये बाजारपेठेमुळे लगबग सुरू असती मात्र ऐन लक्ष्मी सणाच्या दिवशीच ही बाजारपेठ बंद करण्यात आल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला आहे मराठा बांधवांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूरपणे प्रतिसाद देत ही बाजारपेठ बंद ठेवल्याचं दिसले आहे
पुण्यात महिलांचा वेश करून कंपनीमध्ये चोरी,वानवडी पोलिसांकडून सराईत चोरटे अटकेत
महिलांसारखा वेश करून रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून दोन लाख रुपयांच्या तांब्याच्या तारांचा बंडल चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली.
आरोपीकडून दोन लाख १९ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा आणि पट्ट्या जप्त करण्यात आल्या.
अमन अजीम शेख (वय २४), मुसा अबू शेख (वय २४, दोघे रा. रामटेकडी, हडपसर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
रामटेकडी परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या हारको ट्रान्सफॉर्मर कंपनीत २६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री ही चोरी झाली.
सायन - पनवेल हायवेवर वाशी टोल नाका येथे वाहतूक कोंडी झाली आहे. वाशी ते मानखुर्द पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. सोमवारचा दिवस आणि मराठा आंदोलन यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली. पोलीसांकडून वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय.
कणकवलीतील तरंदळेच्या जंगलात दुर्मीळ चमकणारी बुरशी आढळून आली आहे. दिवसा पिवळसर पांढरी दिसणारी ही बुरशी रात्रीच्या अंधारात चमकून हिरवीगार दिसते. ही बुरशी फक्त जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात दिसून येते. या चमकणा-या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला आहे. ही बुरशी सह्याद्रीच्या पट्ट्यातील जंगलात, गुजरात व लक्षद्वीप या ठीकाणी आढळून येते.
मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खरे बोलण्यास मनाई आहे. जिथे हवसे,गवसे,नवसे आहेत.. जो लोकांना सर्वात जास्त मूर्ख बनवू शकतो...तो सर्वात चांगला नेता बनू शकतो...श्री कृष्णाने सांगितल्या प्रमाणे अंतिम निर्णय सत्याचा होतो..नितीन गडकरी
- नामफलकावर 'पूर्व नागपूर' लिहिण्याचा वाद,काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांच्या नाम फलकावर काळे फासले
- भाजप कार्यकर्त्यांनी काळ फसल्याचा आरोप
- अभिजित वंजारी यांचे सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील आंबेडकर चौकात जनसंपर्क कार्यालय आहे..
- अभिजीत वंजारी हे विधान परिषद सदस्य आहेत, असे असताना, त्यांनी कार्यालयाच्या फलकावर 'आमदार अभिजीत वंजारी यांचे जनसंपर्क कार्यालय, पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्र' असे लिहिले आहे...
- वंजारी हे स्वतःला पूर्व नागपूरचे आमदार असल्याचे दाखवत असून हे नियमांची पायमल्ली असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाने केला होता....
- यानंतर आमदार वंजारी यांच्या जनसंपर्क कार्यालयातील नामफलकाला काळे फासण्यात आले
- काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी लकडगंज पोलीस ठाण्यात भाजप कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचा आरोप करत पोलीस तक्रार केली...
- या प्रकारामुळे पूर्व नागपूर विधानसभेचे भाजप आमदार कृष्णा खोपडे विरुद्ध अभिजित वंजारी यांच्यात वाद तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे...
- मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॅा. बबनराव तायवाडे यांची फोनवरुन चर्चा
- आजच्या मुंबईतील बैठकीत आंदोलनाबाबत जो निर्णय होईल, त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार
- नागपुरात उपोषण सुरु असल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी बोलावलेल्या आजच्या बैठकीत डॅा. बबनराव तायवाडे सहभागी होणार नाही
- नागपूरात राष्ट्रीय ओबीसी महासंघांच साखळी उपोषण सुरु असल्याने बबनराव तायवाडे बैठकीला जाणार नसल्याचं सांगितलं...
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी अंतरवली सराटी मध्ये उपोषणाला बसण्याची ओबीसी आंदोलकांनी प्रशासनाकडे परवानगी मागितलीय.आज दहा वाजता आपण उपोषणाला बसणार असल्याचं ओबीसी कार्यकर्ते बाळासाहेब बटुळे आणि बाळासाहेब दखने यांनी सांगितले आहे मात्र प्रशासनाने या आंदोलकांना आंदोलनाचे स्थळ तसेच आंदोलनाला बसणाऱ्या इतर लोकांची माहिती देण्याचं कळवले आहे.दरम्यान या बाबीची पूर्तता केल्याशिवाय आंदोलकांच्या परवानगीचा निर्णय घेता येणार नसल्याचे पोलिसांनी आंदोलकांना कळवलय. दरम्यान अंतरवली सराटी परिसरातील सोनिया नगर येथे ओबीसी आंदोलक ओबीसी आरक्षण बचावासाठी उपोषणाला बसणार असल्याची माहिती आहे. दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मागील तीन दिवसांपासून मुंबईत आझाद मैदानावर अमरन उपोषण करत असून त्यांच्या सोबत लाखो आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र सरकारने खाऊ गल्ली बंद केली असल्याने मराठा आंदोलनाची गैरसोय होत असल्याने परभणी जिल्ह्यात मराठा बांधव सरसावले असून मुंबईतील 40 ते 50 हजार आंदोलकांना पुरले इथल्या भाकरी, ठेचा, लोणचं, मिरचीचे खार, मुरमुरे, कांदे, चटणी, भाजीपाला पाठवला आहे सरकार मराठा आंदोलनावर अन्याय करत असल्याने जो पर्यंत आंदोलन सुरू राहिला तो पर्यंत खाण्याचे पदार्थ पाठवले जाणार असल्याचे यावेळी समाज बांधवांनी सांगितले आ
त्यात कालच डॉक्टर यांनी त्यांना पाणी जास्त पिण्यास सांगितले आहे ,ors घेण्यास सांगितले आहे ...
सध्या जरांगे यांची शुगर ही फक्त 70 च्या आसपास आहे ...
त्यामुळे पाणी ही त्याग केलास त्यांची प्रकृती खालावू शकते असे डॉक्टर टीम कडून सांगण्यात येत आहे
विरारच्या रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटनाग्रस्त नागरिकांना राहण्यासाठी शासनाने तात्पुरत्या स्वरूपासाठी म्हाडाची घरे देण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी दुपारी या 60 दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना पालघर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेंद्र गावित यांनी म्हाडाच्या घराच्या चाव्यांचा वाटप केला असून प्रत्येक कुटुंबाला 20 हजाराची आर्थिक मदत केली आहे. यावेळी वसई विरार पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त अधिकारी उपस्थित होते.
मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून आझाद मैदानामध्ये लाखो मराठा बांधव दाखल झालेला आहे तसेच कर्नाटक मधील बेळगाव मधील सकल मराठा व मराठी क्रांती सीमा भाग मोर्चा संघटनेच्या माध्यमातून बेळगाव मध्ये मूक मोर्चा काढण्यात आला होता मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी हा मुख्य मोर्चा होता
त्यामुळे हजारो मराठा बांधव बेळगाव मधून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानामध्ये उपस्थित झाला आहे
मराठा बांधव दोन दिवस गैरसोय झाली होती त्यानंतर राज्यभरातून माता-भगिनीने मराठा बांधव उपाशी राहू नये यासाठी भाकरी आणि ठेचा पाठवण्यात आला आहे तसेच राज्यभरातून बिस्किट पाण्याची बॉटल कडधान्य जीवनावश्यक वस्तू हे सर्व पाठवण्याच काम करण्यात आलं आहे तसेच सकाळचा नाश्ता मराठा बांधवांचा भाकरी आणि ठेचा मराठा बांधव खाताना दिसून येत आहेत
पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषणसंबंधी नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान ७ दिवस सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी देण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केला आहे.
सुधारणा करण्यात आली आहे असून,आजपासून रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी दिली होती.मात्र, त्यात बदल करत आता रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.
ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराच्या निर्बंधास सूट दिल्याबाबत यापूर्वीच्या 18 ऑगस्टच्या आदेशात बदल करून हे सुधारित आदेश जारी केले आहेत. .
त्यानुसार आता उद्या २ सप्टेंबर ६ सप्टेंबर या दिवशी पहाटे ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धकाचा वापर करण्यास परवानगी दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील मानाच्या गणपतीसह महत्त्वाच्या गणपतीचे आज सकाळी दर्शन घेणार
प्रमुख पाच मानाचे आणि इतर प्रमुख गणेश मंडळासह कार्यकर्त्यांच्या मंडळांनाही भेटी देणार
सकाळी ९.३० वाजल्यापासून कसबा गणपती पासून करणार दर्शनाला सुरुवात
आज दुपारी अडीच वाजल्यापासून रात्री दहा पर्यंत मुख्यमंत्री पुण्यात
मानाचा गणपती सह इतर गणपतीचे घेणार दर्शन
अभिनेता नाना पाटेकर यांच्या घरच्या गणपती दर्शनालाही जाणार
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी प्रवेशा च्या पुढील फेरीला सुरुवात
प्रवेश प्रक्रियेत मुलाखतीसाठी 100 गुण राहणार आहेत
अंतिम निकाल तयार करताना प्रवेश प्रक्रियेतील परीक्षेच्या गुणांना अधिक महत्त्व दिले जाणार
मराठा आंदोलक आणि जरांगे पाटील यांची बदनामी करणाऱ्यांना तृप्ती देसाईंचे जोरदार प्रत्युत्तर- योध्दा शरण जात नाही तेंव्हा बदनाम केला जातो. बरोबरी करता येत नाही तर बदनामी तरी करू नकातृप्ती देसाई
पालिका अधिकारी यांच्यावर होणारे हल्ले आंदोलन पालिकेचे नुकसान यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कृती दलाची निर्मिती
पथकातील दहा जणांची पहिली तुकडी आज पासून मुख्य इमारतीच्या सुरक्षिततेसाठी सेवेत रुजू होणार आहे.
काही दिवसांपूर्वी आयुक्त कार्यालयात झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेकडे सध्या १२०० सुरक्षा कर्मचारी आहेत.त्यापैकी ५० कर्मचाऱ्यांची क्युआरटीसाठी निवड करण्यात आली असून, प्रशिक्षित दहा कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी आजपासून कार्यरत
पुढील टप्प्यात महापालिकेच्या पाच परिमंडळांत प्रत्येकी पाच जणांचे क्युआरटी पथक नियुक्त केले जाईल. अतिक्रमण,आकाशचिन्ह विभाग,१५ क्षेत्रीय कार्यालये, वाहन विभाग, कचरा डेपो, उद्याने, पाण्याच्या टाक्या अशा ठिकाणीही या पथकांची नेमणूक होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.