Shivraj Divate News Saam tv
महाराष्ट्र

Shivraj Divate News : घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठिशी; मनोज जरांगेंनी दिला शिवराज दिवटेला धीर

Shivraj Divate News Update : मनोज जरांगे यांनी शिवराज दिवटे याची भेट घेतली. जरांगे यांनी भेट घेऊन शिवराजला धीर दिला. तसेच बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.

Vishal Gangurde

योगेश काशिद, साम टीव्ही

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामुळे बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे. बीडच्या परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. शिवराज दिवटेला बेदम मारहाण केल्यानंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे. शिवराज दिवटे प्रकरणाचा पोलिसांनीही शोध सुरु केला आहे. या प्रकरणी आतापर्यंत काही आरोपींना अटक केली आहे. परळीत मारहाण झालेल्या या शिवराज दिवटेची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेतली. यावेळी जरांगे पाटील यांनी शिवराजला धीर दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी आज रविवारी शिवराज दिवटे याची भेट घेतली. मनोज जरांगे यांनी सहकाऱ्यासह रुग्णालयात जाऊन शिवराजची भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी शिवराजला धीर देत आम्ही तुझ्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली. जरांगे पाटील यांनी पोलिसांकडे तात्काळ कारवाईची मागणी केली.

परळीतील टोकवाडी परिसरात शिवराज दिवटे या तरुणाला अमानुष मारहाण करण्याची घटना घडली होती. त्याच्यावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या ठिकाणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवराजशी संवाद साधत तुझ्या पाठीशी आहोत, असा धीर देखील दिलाय. या प्रकरणात दोषी असलेल्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी उद्या बीड जिल्हा बंद

शिवराज दिवटे मारहाण प्रकरणी मराठा संघटनांकडून उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमधील उद्याचा बंद शांततेत होणार आहे. बीडचा बंद कोणा एकाचा नाही. शांतता प्रेमी नागरिकांनी एकत्र येऊन हा बंद पुकारला आहे. शांततेच्या मार्गाने शिवराज दिवटेला न्याय मिळाला पाहिजे, या मागणीसाठी बंद पुकारण्यात आला आहे, अशी माहिती मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली.

मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याने बीडची तुलना बिहारशी केली जात आहे, ही गोष्ट थांबली पाहिजे. बीड जिल्ह्याचे नाव खराब न होण्यासाठी आणि बीडची गुन्हेगारी थांबवण्यासाठी हा बंद करण्यात येणार आहे, असं मराठा संघटनेचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT