Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या सभेसाठी जय्यत तयारी; कल्याणमध्ये २० नोव्हेंबरला सभा

Kalyan News : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली

Rajesh Sonwane

अभिजीत देशमुख

कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात मनोज जरंगे पाटील यांची सभा नियोजित आहे. (Kalyan) सदर सभा मराठा क्रांती मोर्चाकडून होत असून सभेची जय्यत तयारी सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Manoj Jarange Patil) बालेकिल्ल्यात सभत होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Breaking Marathi News)

मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) आंदोलन केल्यानंतर मनोज जरंगे पाटील रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात दौरे व सभा घेणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील पोटे मैदानात येत्या २० नोव्हेंबरला सोमवारी जरांगे पाटील यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सभेपूर्वी निघणार सायकल रॅली 

२० तारखेला सायंकाळी सहा वाजता कल्याण पूर्व चक्की नाका येथे जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत होणार असून त्यानंतर बाईक रॅली होणार आहे. या सभेसाठी पोटे मैदानात स्टेज उभारणे, मॅट टाकणं, जमिनीचे सपाटीकरण ,एलईडी लावणे,शहरात बॅनर लावणे असे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. पाटील यांच्या सभेसाठी पोलिस यंत्रणा देखील सज्ज झाली. जरांगे पाटील यांच्या सभेच्या निमित्ताने कल्याणमधील सत्ताधारी शिवसेना शिंदे गट ,भाजपा, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, आम आदमी पार्टीमधील मराठा नेते एकत्र आल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT