Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: ठाण्यात उद्या मनोज जरांगेंची जाहीर सभा; वाहतुकीत होणार 'हे' मोठे बदल

विकास काटे, ठाणे

Thane News:

ठाण्यात उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. गडकरी रंगायतन या ठिकाणी जरांगेंची सभा होणार आहे. या सभेसाठी पोलीस दल देखील सज्ज झाले असून रस्ते वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.

आज पोलिसांकडून सभेच्या ठिकाणची पाहणी करण्यात आलीये. तसेच योग्य सूचना आयोगाला दिल्या आहेत. जरांगेंच्या सभेच्या पार्श्वभूमिवर पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर सखल मराठा क्रांती मोर्चाचे आयोजक कार्यकर्त्यांना आयकार्ड देखील दिले जाणार आहेत.

मंगळवारी सकाळी जरांगे पाटील येणार असल्यामुळे वाहतुकीचेही नियोजन करण्यात आले आहे. शांततेच्या माध्यमातून सभा झाली पाहिजे अशा सूचना आयोजकांना पोलिसांनी दिल्या आहेत. कार्यक्रम शांतेत व्हावा आणि कोणताही गोंळध होऊनये यासाठी आयोजकांमधील कार्यकर्त्यांना आयकार्ड देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळच्यावेळेस सभा असल्यामुळे वाहतुकीत काही बदल करत नागरिकांनी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे. उद्या होणाऱ्या सभेसाठी जरांगेंच्या स्वागताच्या मार्गात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी देखील सभेच्या मिरवणुकीच्या वेळेस वाहतुकीत बदल केले आहेत.

रॅलीचा मार्ग - खारेगाव टोल नाका - माजिवडा - पाचपाखाडी - राम मारुती रोड - तलावपाळी - चिंतामणी चौक - गडकरी रंगायतन हा मार्ग आहे. मूस चौक ते गडकरी रास्ता बंद करण्यात आला आहे. गडकरी सर्कलचा रस्ता देखील बंद केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar Trip: अमृताची आई वडिलांसोबत लंडनवारी; ट्रीपचे फोटो पाहा

Eknath Shinde News | मुख्यमंत्री शिंदेंच्या बॅगांची तपासणी! मोठी बातमी...

Today's Marathi News Live : Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

Eknath Shinde : मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताच बॅगांची झाडाझडती

Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT