Manoj Jarange Patil Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: '... तर मराठा नेत्यांना देखील पाडा', शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे कडाडले VIDEO

Manoj Jarange Patil Maratha Reservation Rally 2nd Day: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा दिवस आहे. यावेळी जरांगेंनी मराठ्यांच्या नेत्यांना पाडण्याचं आवाहन केलंय. नेमकं मनोज जरांगे काय बोलले, ते आपण सविस्तर जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

माधव सावरगावे, साम टीव्ही छत्रपती संभाजीनगर

मनोज जरांगे पाटलांनी आज मराठा नेत्यांना देखील पाडण्याचं आवाहन केलंय. जरांगे पाटील शांतता रॅलीच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना कडाडले आहेत. ओबीसींच्याच नाही तर मराठ्यांना त्रास देणाऱ्या मराठ्यांच्या नेत्यांना देखील पाडा. मराठ्यांना त्रास व्हायला नको, असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलंय.

जरांगे पाटलांची नेमकी भूमिका काय?

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले की, मराठ्यांचा लढा मी लढत असल्यामुळे अनेक जणांचं पोट दुखतंय. यामध्ये आमचेही काहीजण आहेत. त्यामुळे मला उघडं पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. काही ठिकाणी माझ्या विरोधात पत्रकार परिषदा सुरू आहे. पण माझ्याविरोधात बोलणारे समाजाच्या नजरेत उघडे पडत आहेत. तात्पुरते वाद लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. जर मला संपवलं गेलं, तर समाजाला आरक्षण मिळणार (Maratha Reservation Rally) नाही. त्यामुळे समाजाने आंदोलन आणि माझ्या पाठीशी उभे राहायला हवं असल्याची भूमिका जरांगेंनी मांडली आहे.

भुजबळांवर आरोप

समाजाची खदखद असल्यामुळे ते आंदोलनात सहभागी होत आहेत. हाकेंना विरोधक मानत नाही, यामागे भुजबळ असल्याचा आरोप त्यांनी केला आहेत. मराठ्यांच्या नोंदी सापडलेल्या असताना आपले नेते मराठ्यांना आरक्षण द्यायला नाही म्हणतात, असं सामान्य ओबीसी लोकांना वाटतं म्हणून ते देखील आंदोलनात सहभागी होत असल्याचं जरांगेंनी सांगितलं (OBC Reservation) आहे.

मला मुख्यमंत्री व्हायचं नाही...,

या निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करायचे ठरले, तर सगळ्या जाती धर्माचे लोक उभे करणार आहे. सगळ्या जातीचे उभे राहू द्या. अजून दौऱ्याचे टप्पे दौऱ्याचे बाकी आहेत. मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, राजकारण हा माझा मार्ग नाही असं जरांगे पुन्हा म्हणाले आहेत. ५७ लाख नोंदी सापडल्यात, तरी दीड कोटी मराठा आरक्षणात गेला (Maratha Reservation) आहे. या आंदोलनामुळे १० टक्के आरक्षण मिळालेलं आहे, पण हे टिकणार नसल्यामुळे लढा सुरू असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT