मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्लीचा नारा दिला.
मराठा समाजाचे अधिवेशन आता दिल्लीत होणार आहे.
हैद्राबाद-सातारा गॅझेट अंमलबजावणीनंतर तारीख जाहीर होईल.
बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधीि
Manoj Jarange Patil : मराठा समाजातील नेते, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांनी चलो दिल्ली असा नारा दिला आहे. देशभरातील मराठा समाजाचे देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अधिवेशन होणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. या अधिवेशनाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. हैद्राबाद गॅझेट, सातारा गॅझेट यांची अंमलबजावणी झाल्यानंतर हे अधिवेशन होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली. हैद्राबाद गॅझेट संदर्भातील या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी चलो दिल्ली अशी घोषणा केली. हैद्राबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट यांची सरकारद्वारे अंमलबजावणी झाल्यानंतर देशाच्या राजधानीत मराठा समाजाचे अधिवेशन भरवले जाणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले.
धाराशिवमधील बैठकीत मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याबाबतही माहिती दिली. 'यंदाचा मराठा समाजाचा दसरा मेळावा साधेपणाने होणार आहे. बीड जिल्ह्यातील नारायण गडावर मराठा समाजाचा दसरा मेळावा होणार आहे. आंदोलनात वेळ गेल्याने तयारीला फक्त वीस दिवसच मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाजाने एकजूट दाखवायला पाहिजे', असे जरांगे पाटील यांनी म्हटले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी चलो मुंबई या मोर्चाचे नेतृत्त्व केले होते. मुंबईतील आझाद मैदानावर जरांगे यांच्या नेतृत्त्वात मराठा बांधव जमले होते. आझाद मैदानावर त्यांनी मराठा आरक्षणासह अन्य इतर मागण्यांसाठी आमरण उपोषण केले. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.