Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठा आंदोलनावेळी सरकारकडून 'संकटमोचक' म्हणून गेले त्या गिरीश महाजनांवरच मनोज जरांगेंचे गंभीर आरोप

Manoj Jarange Patil On Girish : देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगेंनी आज गिरीश महाजनांकडे मोर्चा वळवला आहे. भाजप नेते गिरीश महाजन फसवणारा माणूस असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीआधी आणि निवडणुकीनंतर मनोज जरांगें आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी सरकारने शिष्टमंडळ पाठवलं होतं. त्या शिष्टमंडळात गिरीश महाजन संकटमोचक म्हणून गेले होते. त्यांच्यावरही आज जरांगेंनी गंभीर आरोप करत जोरदार हल्ला चढवला. गिरीश महाजन फसवतात, आंदोलन फोडण्यासाठी काम करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करणाऱ्या जरांगेंनी आज गिरीश महाजनांकडे मोर्चा वळवला आहे.

ज्या दिवशी अंतरवाली सराटीत 4 जूनला सरकारचं शिष्टमंडळ आलं होतं. त्यात गिरीश महाजन होते. ती चर्चा ऐका गाफील राहू नका. त्यादिवशी सगे सोयरेची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सर्वांचं एक मत झालं होतं. मात्र गिरीश महाजन म्हणाला सगे सोयरे टिकत नाही. त्यावेळी कळलं होत सरकार कोणाचं नसतं. राजकारणी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी काहीही करतात.

महाजन साहेब आमचं आरक्षण टिकलं नाही तर नाही टिकूदे, पुन्हा आंदोलन करू. मला माहितेय सगे सोयऱ्याची अंमलबजावणी झाली तर आरक्षण टिकणारच. मला माहित होतं तुम्ही डाव टाकणार, मात्र मी क्षत्रिय मराठ्यांचा आहे.विदर्भातील मराठ्यांचा आणि आपला व्यवसाय एकच आहे. माझ्या राज्यातील एकही मराठा अरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे. ज्या मराठ्यांची नोंद सापडेल अन् त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, ही आमची मागणी आहे.

लेकरावर अन्याय झाल्यावर दंड थोपटून कसं बाहेर यावं लागतं हे बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी दाखवून दिलं. सरकारने मराठ्यांवर पुन्हा एकत्र येण्याची वेळ आणू नये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना जाहीरपणे सांगतोय, हा आक्रोश पहा, इतक्या उन्हात हा मराठा समाज इथं बसला आहे. लेकरांच्या न्यायापायी इथला मराठा काहीच विचार करत नाही. बीड जिल्ह्यातील सर्वच मराठा आता ताकदीने उभा ठाकला असल्याचं जरांगें म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT