Manoj Jarange Patil  Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'आरक्षण दिलं नाही तर, एकही आमदार निवडून येणार नाही'; फडणवीसांच्या विधानानंतर जरांगेंचा इशारा

Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत चुकीचा प्रचार केल्यामुळे मराठा समाजाच्या मतांचा महाविकास आघाडीला फायदा झाला असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्यावर मनोज जरांगे पाटील यांनी घणाघाती टीका केली आहे.

Sandeep Gawade

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मराठा समाजात गैरसमज निर्माण केला त्यामुळे महाविकास आघाडीला मराठा समाजाची मतं मिळालं असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. त्याचा मनोज जरांगे पाटील यांनी चांगला समाचार घेतला. मराठा समाज कोणत्याही राजकीय पक्षाच्या बाजून नाही, विनाकारण गैरसमज निर्माण करू नये. योजना लागू केल्या पण अनेक अटीशर्थी घातल्या. मराठा तरुणांना प्रचंड त्रास दिला. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसला. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर विधानसभेत एकही आमदार निवडून येणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे.

106 आमदार तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिले. मराठा समाजाविषयी कोणीही चुकीचा गैरसमज निर्माण केलेला नाही.आता जे 10 टक्के आरक्षण दिलेलं आहे. त्यात अनेक तृटी आहेत. महामंडळ गोरगरिबांच्या कामाचं नाही. तुम्ही नवीन उद्योजकांना अटी का घातल्या. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज मिळत नाही. मी फडणवीस यांना विरोध करतो असं नाही,मात्र सगे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. मराठा समाजावर लाखो गुन्हे दाखल केले. महायुती सरकारने मराठा समाजाचे हाल केले. महाविकास आघाडीने काही आम्हाला तुपाचे डब्बे दिलेले नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी संभ्रमात राहू नये, जे घडलेले आहे ते मान्य करा. मराठा तरुणांना आरक्षणाचा फायदा,गुन्हे मागे घ्या. मला राजकारणात जायचं नाही. जर तुम्ही मागण्या पूर्ण केल्या तर मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील.तुम्ही जर आरक्षण दिलं नाही तर तुम्हाला एकालाही निवडून येऊ देणार नाहीत असा आक्रमक इशारा जरांगेंनी दिला आहे.

तुमचे प्रवक्ते काहीही बोलतात त्याचे परिणाम फडणवीस यांना भोगावे लागतात. तुमच्या प्रवक्त्यांना वेसण घाला. झेंडे फडकवा अन्यथा काहीही करा,हे आंदोलन टिकणार आहे. मराठा समाजाचं आरक्षण कुणी घालवलं हे आम्हाला चांगलं माहीत आहे. आमच्या मतावर कोण बदलत हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही जर ठरल्याप्रमाणे दिलं नाही,तर फडणवीस शिंदे आणि कोणत्याही पक्षासमोर नमतं घेणार नाही. राजकारण आमचा मार्ग नाही. मात्र आम्हाला 50 टक्क्यांच्या आतील ओबीसीतून आरक्षण अशी मागणी त्यांनी पुन्हा लावून धरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चाकण MIDCत वाहतूक कोंडी का होते? नागरिक, उद्योजक आणि राजकीय नेत्यांचा मोर्चा

Mumbai News: १३व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; चेंबूरमधील घटना

Rohit Pawar: 'आईला कशाला मध्ये आणता'! माझ्याशी लढायची भाजपमध्ये ताकद नाही का? रोहित पवार संतापले

Nilesh Ghaiwal : आदेश असताना सुद्धा घायवळचा पासपोर्ट जप्त केला नाही; 'त्या' सहायक पोलीस आयुक्तांवर कारवाई होणार का?

कुख्यात गुंड घायवळवर शिंदेंचा वरदहस्त? रोहित पवारांचा गंभीर आरोप, रामदास कदमांचंही राम शिंदेंकडेच बोट?

SCROLL FOR NEXT