Manoj Jarange Patil Hunger Strike Day 3 Saam TV Marathi
महाराष्ट्र

Manoj Jarange : उपोषणाचा तिसरा दिवस अन् अचानक वाढली शुगर! जरांगे पाटलांचा सरकारवर मोठा आरोप; काय म्हणाले डॉक्टर?

Manoj Jarange Patil Hunger Strike Day 3: मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या शुगर लेव्हलमध्ये बदल झाल्याने त्यांनी सरकारवर संशय व्यक्त केला. मात्र डॉक्टरांनी उपोषणादरम्यान शुगर स्थिर किंवा किंचित वाढणे शक्य असल्याचे स्पष्ट केले.

Namdeo Kumbhar

Manoj Jarange Patil hunger strike : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जालना) येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. अन्न-पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावत चालली आहे. दरम्यान, वैद्यकीय तपासणीनंतर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण (शुगर) कमी होण्याऐवजी वाढल्याचे समोर आल्याने जरांगे पाटील यांनी डॉक्टरांच्या अहवालावर आणि सरकारवर गंभीर संशय व्यक्त केला आहे. "मी काही खाल्ले असल्यास जिथे सांगाल तिथे जीव देतो," असा संतप्त सवाल त्यांनी केला. या संशयावर अखेर तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनीही तातडीने स्पष्टीकरण दिले आहे.

माझी शुगर वाढतेय कशी? – जरांगे पाटलांचा गंभीर आरोप

वैद्यकीय तपासणीदरम्यान आपल्या रक्तातील साखरेची (Sugar) पातळी वाढल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. पहिल्या दिवशी शुगर ९४ होती, काल ती ६६ वर आली, मात्र आज ती ७२ आणि नंतर थेट ८० झाली. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले, उपोषणात माझी शुगर कमी व्हायच्या ऐवजी वाढत कशी आहे? यात सरकारचा काही डाव तर नाही ना? तुम्हाला वाटत असेल मी काही खातो, तर स्वतः मशीन आणून माझ्या पोटात घोटभर तरी पाणी आहे का ते चेक करा. मी काही खाल्ले असल्याचे सिद्ध झाले, तर तुम्ही जिथे सांगाल तिथे मी माझा जीव देईन.

डॉक्टरांचे स्पष्टीकरण:

मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केलेल्या या संशयानंतर त्यांची तपासणी करणारे डॉ. अमोल खवणे यांनी माध्यमांशी बोलताना परिस्थिती स्पष्ट केली. डॉ. खवणे म्हणाले की, जरांगे पाटलांची शुगर वाढलेली नसून ती मर्यादेतच (Limit) आहे. जेव्हा माणूस अन्न त्याग करतो, तेव्हा शरीरातील यकृत (Liver) आणि इतर अवयव साठवून ठेवलेल्या घटकांचे रूपांतर साखरेत (Glucose) करतात, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी काही वेळ स्थिर किंवा किंचित वाढलेली दिसू शकते. यात कोणतीही शंका घेण्यासारखे कारण नाही.

चलो मुंबई'चे आवाहन

प्रकृती खालावत असतानाच जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळावरून मराठा बांधवांशी संवाद साधला. त्यांनी संपूर्ण मराठा समाजाला 'चलो मुंबई'चा नारा देत मुंबईच्या दिशेने निघण्याचे आवाहन केले. "सर्वांनी आजपासूनच मुंबईला जाण्यास सुरुवात करावी आणि तिथे असलेल्या आपल्या पाहुण्यांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे राहावे," असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे. जरांगे पाटलांच्या या भूमिकेमुळे आणि वैद्यकीय अहवालावरून निर्माण झालेल्या वादामुळे जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिक तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : वडाळ्यात भीषण अपघात; ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना किती मदत मिळणार? कृषीमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai News: मुंबई हादरली! बाथरूमध्ये आढळला डॉक्टरचा मृतदेह, सायन रुग्णालयालयात नेमकं काय घडलं?

Chanakya Niti: आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर या 7 गोष्टी लक्षात ठेवा; तुमच्यावर कधीही वाईट वेळ येणार नाही

SCROLL FOR NEXT