Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : उद्याचं सगळं ठरणार..आता अवधी नाही; सगेसोयरेच्या मागणीवर मनोज जरांगें ठाम, सरकारला दिला इशारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणावर आज राज्याच्या दोन्ही सभागृहात एकमतान ठराव मंजूर करण्यात आला. नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत.

Sandeep Gawade

Manoj Jarange Patil

मराठा आरक्षणावर आज राज्याच्या दोन्ही सभागृहात एकमतान ठराव मंजूर करण्यात आला. नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. मात्र मनोज जरांगे पाटील सगेसोयरेच्या मागणीवर ठाम आहेत. सगेसोयरेची मागणी मान्य करून ओबीसीतूनच आरक्षण द्या अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सारोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

सरसरट मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गोर गरीब मराठ्यांना आंदोलनाशीवाय पर्याय नाही. सरकारला नाराजीला सामोरं जावं लागणार हे नक्की. मराठा समाज आमच्या न्यायासाठी लढत आहे. सरकारने दिलेलं आरक्षण आम्ही स्वीकारलं आहेच, पण मूळ मागणी ओबीसी मधून आरक्षणाची आहे. त्यावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम नक्की?

विधीमंडळ अधिवेशनात मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगें यांच्याविधानांमुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर जरांगेंनी भुजबळांवर सडकून टीका केली. त्यांनी विचार केला असता तर वातावरण इतकं बिघडलं नसतं. मात्र त्यांनी मराठा समाजाविरोधात जी भूमिका घेतली, त्यामुळे ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा यावेळेस कार्यक्रम होणार हे नक्की, अशा शब्दात त्यांनी त्याचा समाचार घेतला. त्यांच्यावर कोणीही हल्ला करणार नाही. मात्र त्यांना स्वतःचा स्वार्थ साधणं एवढंच कळतं.

60-70 वर्षे वेळ घेणार का?

सरकारच्या निर्णयाचं आम्ही स्वागत केलं, पण मूळ मागणीचं काय? अजून 60-70 वर्षे वेळ घेणार का? असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. सरकारला आम्ही दोन ते तीन वेळा वेळ दिला आहे. मात्र सरकार आमच्या मूळ मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण दिलंय एवढं आपल्याला समजतं.सरकारने सगेसोयरेंसंबधी कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुशे आमचं उद्या सगळं ठरणार आहे. आता सरकारला अवधी नाही. वा रे मराठ्यांचे मंत्री, असा टोला लगावत त्यांनी आता मराठा समाजाने चूक करू नये.

आता एकही मराठा मागे हटणार नाही

सगेसोयरे बाबत समाजाची स्पष्ट भूमिका आहे. अंमलबजावणी होईपर्यंत एकही मराठा मागे हटणार नाही. लढण्यासाठी सज्ज आहोत. उद्या मराठा समाजाची तातडीची बैठक आहे, त्या आधी कोणीही कोणतंही आंदोलन करू नका अशी विनंती त्यांनी केली आहे. उद्या आपण कायम आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत.100-150 जणांना लागणारं आरक्षण दिलं त्यासाठी कौतुक सुद्धा केलं. अंमलबजावणी झाली असती तर अख्खा महाराष्ट्र गुलाल घेऊन गेला असता. जे धोकादायक आहे तेच नेमकं दिलं गेलं आहे, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT