Pandharpur rally: Manoj Jarange Patil addresses Maratha community, announces August 29 protest with emotional appeal. saam tv
महाराष्ट्र

एकवेळ मी फाशी घेईन पण ...; मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाला भावनिक आश्वासन

Manoj Jarange Patil Turns Aggressive Again, Announces August 29 Protest: मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिक आश्वासन देत 29 ऑगस्टला आंदोलनाची घोषणा केली आहे. कुणबी प्रमाणपत्र आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली असून मराठा समाजाला एकजूट राहण्याचे आवाहन केले आहे.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी परत एकदा 29 ऑगस्टला आंदोलन करणार असल्याचे सांगितल्याने महायुती सरकारला मोठे टेन्शन आले आहे. मराठा समाजाला देण्यात आलेल्या कुणबी प्रमानपत्रांना जात वैधता दिली जात नाहीये, असा आरोप जरांगे यांनी केला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर त्यांनी घणघाती हल्लाबोल चढवला आहे. बावनकुळे हे मराठा समाजाची प्रमाणपत्र रद्द करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना जनावरांचे इंजेक्शन दिल्याशिवाय ते व्यवस्थित होणार नाहीत अशी सडकून टीका त्यांनी केली. तसेच त्यांनी मराठा समजाला आवाहन केले आहे. मराठ्यांनी एकजूट व्हावे, असे जरांगे म्हणाले.

एकवेळ मी फाशी घेईन पण समाजाला फसवणार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दौरा सुरू केलाय. आज त्यांनी पंढपरपुर येथे जाहीर सभा घेतली. मी मराठा समाजाला कधीच चुकीचे सांगितले नाही. मी एकवेळ स्वतः फाशी घेऊन मरेन. पण समाजाला खोटं सांगून फसवणार नाही. समाजाचा माझावर मोठा विश्वास आहे. तो मी कधीच गमावणार नाही असे भावनिक आश्वासन ही जरांगे पाटील यांनी दिले. आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथी सभा झाली.

सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजाची मी कधीच फसवणूक करणार नाही असे स्पष्ट केले. विरोधकांकडून जरांगे मराठा समाजाची फसवणूक करत असल्याची टीका केली जात आहे. यावर त्यांनी समाजासाठी फाशी घेईन पण खोटं बोलणार नाही. माझ्यात जातीवंत मराठ्याचे रक्त आहे. मी कधीही समाजासोबत गद्दारी करणार नाही असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar Tourism : हिरव्या डोंगररांगा अन् समुद्राची गार हवा, भाईंदरजवळील 'हा' बीच तुम्हाला नक्की आवडेल

Maharashtra News Live Update: धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचं ठिय्या आंदोलन .

Weather Update: चार राज्यात धो-धो बरसणार; हवामान विभागाकडून मोठी अपडेट,महाराष्ट्रात काय असेल स्थिती?

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर ट्रक आडवा लावून चालक पसार, २ तास वाहतूक कोंडी; प्रवासी हैराण, पाहा VIDEO

पावसाळ्यात मुलांना दूध देताय? ७ चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT