Manoj Jarange Patil saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil On CM and DCM: बरेच पुरावे आम्ही शोधून काढलेत, तरी देखील आम्हाला आरक्षण देण्यात आलेले नाही.

Ruchika Jadhav

Manoj Jarange Patil:

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी मराठा आरक्षणावर ते बोलतील असं सर्वांना वाटलं होतं. मोदी आरक्षणाबाबत काहीही न बोलल्याने मनोज जरांगे पाटलांनी पंतप्रधानांसह राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत.

आरक्षणाचा मुद्दा एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पंतप्रधानांकडे काल मांडला नसावा. नाहीतर मोदींनी स्वत:हून या विषयावर बोलणं टाळलं असावं. मोदी गरिबांच्या पाठीशी कायम असतात असं ऐकलं होतं. मात्र तसं दिसत नाहीये, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र

मराठ्यांना आरक्षण मिळालं तर त्यांची पोरं मोठी होतील. त्यामुळे त्यांना आरक्षण द्यायचं नाही, असं मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. बरेच पुरावे आम्ही शोधून काढलेत, तरी देखील आम्हाला आरक्षण देण्यात आलेले नाही. आतापर्यंत ज्यांच्याकडे काही पुरावे नाहीत त्यांच्यासाठी देखील वेगवेगळे कायदे केले जातायत. मात्र सरकारला आम्हाला पुढे जाऊ द्यायचं नाही, असा गंभीर आरोप जरांगेंनी केलाय.

समिती देखील आम्हाला मान्य नाही

समितीला आता मुदतवाढ मिळणार नाही. याआधी देखील आम्ही मुदतवाढ दिली आणि पुरावेही दिले; मात्र समितीला ते पुरावे कमी पडतायत. त्यामुळे आता ही समिती देखील आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्री मराठा जातीचे असतील नाहीतर आणखीन कोणत्याही जातीचे असतील, मात्र यांना आम्हाला मोठं करायचं नाही. त्यामुळे ते आरक्षण देत नाहीयेत. मराठ्यांची पोरं त्यांना बर्बाद करायची आहेत, अशा शब्दांत जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: घरातले वातावरण आनंद राहील; 8 राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Fatty Liver Disease: पायांमध्ये ही 3 महत्त्वाची लक्षणं दिसली तर समजा लिव्हरवर चरबी साचलीये!

VIDEO VIRAL : ईssssss....गच्चाळ जागेवरच चिवड्याचा ढिग, तो कामगार अन् पॅकिंग... व्हिडिओ बघून किळस येईल

बांगलादेश,नेपाळनंतर आणखी एका देशातील सरकार बदलणार? राजधानीची बॉर्डर कंटेनर्सनं सील

Maharashtra News Live Update: Dhule: पुण्यातील खडक पोलीस स्टेशनच तपास पथक पोलीस आयुक्तांनी केल्या बरखास्त

SCROLL FOR NEXT