Attempt to attack Manoj Jarang  Saam TV
महाराष्ट्र

Manoj Jarange: माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट, संपूर्ण थरारच सांगितला

Manoj Jarange attack: नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असं जरांगे यांनी सांगितलं आहे.

Satish Daud

Attempt to attack Manoj Jarang

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असं जरांगे यांनी सांगितलं आहे. अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचे तातडीने कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं अन् सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जोपर्यंत राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नाही, असंही जरांगेंनी ठणकावून सांगितलं. (Latest Marathi News)

'माझ्यासोबत घातपाताचा प्रकार'

मनोज जरांगे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना मोठा गौप्यस्फोट केला. नाशिक जिल्ह्यात दौरा करत असताना साल्हेर किल्ल्याजवळ माझ्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी देखील घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात घेतले होते, असं जरांगे म्हणाले.

आम्ही साल्हेर किल्ल्याजवळ असताना अचानक एक पिकअप सारखी गाडी प्रचंड वेगात आली. ही गाडी आमच्या अंगावर आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण एकाने जोराने आवाज दिल्याने लोकं उड्या मारून बाजूल पडले, असा थरारही जरांगे यांनी सांगितला. आम्ही अशा घटना सांगत बसत नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही त्यांनी भुजबळ यांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News : मीरारोडमध्ये मोठा राडा! मुलीच्या छेडछाडीवरून दोन गटात हाणामारी; २० रिक्षांची तोडफोड

Kapoor Family: फॅम जॅम...! बॉलिवूडच्या कपूर खानादानाचा रॉयल दिवाळी फेस्ट लूक

Relationship Tips: सणासुदीला नवरा-बायकोमध्ये भांडणं का होतात? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Maharashtra Politics: ऐनदिवाळीत राजकीय वादाचा धमाका! माजी आमदारांच्या प्रवेशांवरून भाजपात फुटला वादाचा बॉम्ब; निष्ठावंतांची नाराजी

Maharashtra Live News Update : विरारमध्ये अग्नीतांडव! फर्निचर दुकानं जळून खाक

SCROLL FOR NEXT