Manoj Jarange Patil Antarwali Sarati protest stage removed saam tv
महाराष्ट्र

जरांगे रुग्णालयात अंतरवालीतला मंडप हटवला, 3 वर्षांनी मंडप हटवला, जरांगेंचा नवा 'बॉम्ब'!

Antarwali Sarati Protest Tent Dismantled: गेल्या 3 वर्षांपासून जरांगे ज्या अंतरवालीत आंदोलन करत होते... त्याच अंतरवाली सराटीतील आंदोलनाचा मंडप अखेर हटवण्यात आलाय...मात्र अंतरवालीतील मंडप का हटवण्यात आला? जरांगे मुंबईतील आंदोलनाची तयारी करतायत का? पाहूयात या रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

मराठा आरक्षणाच्या संघर्षाची जिथून ठिणगी पडली... ज्या अंतरवाली सराटीने अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलं... तिथूनच आता एक अत्यंत मोठी अन् धक्कादायक बातमी समोर येतीये यापुढं अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाचा आवाज घुमणार नाही होय... गेल्या ३ वर्षांपासून अंतरवालीत उभारलेला आंदोलनाचा तो उपोषणाचा मंडप ग्रामस्थ आणि सरपंचांनी स्वतःहून काढून टाकलाय. विशेष म्हणजे, मनोज जरांगे पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले असतानाच, हा स्टेज अन् मंडप हटवण्यात आलाय.अचानक घडलेल्या या घडामोडीवर अन् आंतरवालीतील स्टेज हटवण्यावर खुद्द मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया काय आलीये, पाहा...

जरांगेंनी आता अंतरवालीला पूर्णविराम देत, थेट मिशन मुंबईची आखणी केलीये, मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आतापर्यंत तब्बल ११ वेळा उपोषणाचे हत्यार उपसलं. याआधी अख्ख्या अंतरवालीचं लक्ष मंत्रालयाकडे असायचं... पण जरांगेंच्या या एकाच आंदोलनाने थेट दिल्लीच्या तख्ताचेही लक्ष अंतरवालीकडे वेधून घेतले होते. त्याच अंतरवालीतील लाठीचार्जनंतर मराठा समाजाचा हा लढा थेट घराघरात पोहोचला होता. मात्र, आता अंतरवालीतील आंदोलन संपवून जरांगे थेट मुंबईत ठिय्या मांडण्याच्या तयारीत आहेत ज्या जरांगेंना मुंबईच्या वेशीवर रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती... तेच जरांगे आता थेट मुंबईवर धडकणार असल्याने महायुती सरकारचे टेन्शन शंभर पटीने वाढणार, हे मात्र निश्चित!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: हिंगोलीमध्ये रात्री उशिरा आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या शेतात

पगारातून एक रुपयाही कापला जाणार नाही, ₹२५,००० च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कडक निर्देश

८ तास महत्त्वाचे; महाराष्ट्रासह १५ राज्यात वादळी पावसाची शक्यता; ६० किमी वेगाने वाहणार वारे, IMD चा अंदाज काय?

Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

Pitru Paksh 2026 : पितृ पक्षात काय खावे आणि काय खाऊ नये? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT