Raj Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maratha - OBC Reservation: आरक्षणावरील भूमिका राज ठाकरेंना भोवणार? जरांगे आणि हाके यांनी घेतली टोकाची भूमिका

Raj Thackeray: महाराष्ट्रातल्या जनतेला आरक्षणाची गरज नाही असं म्हणणा-या राज ठाकरेंवर आरक्षणाच्या आंदोलनांचे शिलेदार तुटून पडले आहेत. काहींनी राज ठाकरेंना घेराव घालण्याचा प्रयत्न केला तर काहींना जोरदार टीका केलीय. त्यानंतर राज ठाकरेंनीही मराठा आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

Tanmay Tillu

लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहतायत.. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केलीये.. मनसेने देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसलीये.

मनसेच्या कार्यकर्त्यांपासून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंपर्यंत सगळेच मैदानात उतरले आहेत. त्यासाठी राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच धाराशिवमध्ये त्यांनी आरक्षणाबाबत वक्तव्य केलं आणि मराठा आंदोलकांनी त्यांना हॉटेलमध्येच घेराव घातला. त्यानंतर राज ठाकरेंनी मराठा आंदोलकांची समजूत काढली.

राज ठाकरे यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत की, त्यांना काय कळणार आहे. आरक्षण म्हणजे काय, आरक्षण कशासाठी लागतं. हे गरीब मराठा लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक आहेत, सगळेच. तेही सत्तेचा एक भाग आहे. म्हणून त्यांच्यासोबत का आंदोलन करून त्यांना का भेटायचं, असं जरांगे म्हणाले.

''राज यांचा जन्म खरंच प्रबोधनकारांच्या घरात झालाय?''

तर ठाकरे यांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ''तुमचा आरक्षणाबाबतचा दृष्टिकोन आणि भूमिका वाढावा. फुले, शाहू आणि आंबेडकरांचा पंगतीत प्रबोधनकार यांना सुद्धा बघितलं जातं, महाराष्ट्र त्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखतो. त्यांच्या घरात जन्माला येऊन असं असंवेदनशील, असंविधानिक वक्तव्य करून तुम्ही पक्ष चालवत आहेत.''

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेची भूमिका महत्वाची असणार आहे. राज ठाकरेंनी मनसे 225- 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलंय त्यासाठी ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका मतदार स्वीकारणार की त्यांना फटका बसणार याकडे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : साकोलीत नाना पटोले आघाडीवर

Horoscope Today: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस असेल भाग्यशाली, वाचा राशीभविष्य

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

SCROLL FOR NEXT