manoj jarange saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचं असणारं 'हैदराबाद गॅझेट' आहे काय?

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात हैदराबाद गॅझेटची मागणी मान्य करण्यात आली. पण मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचं असणारं 'हैदराबाद गॅझेट' आहे काय? चला जाणून घेऊयात...

Yash Shirke

  • मराठा आरक्षण आंदोलनातील मनोज जरांगे यांची हैदराबाद गॅझेटची पहिली मागणी सरकारने मान्य केली.

  • उपसमितीने गॅझेट अंमलात आणण्यासाठी जीआर काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

  • हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा-कुणबी समाजाच्या ऐतिहासिक नोंदी आढळतात, ज्याचा आधार आरक्षणासाठी घेतला जातो.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा बांधव मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या हैदराबाद गॅझेटची मागणी सरकारने मान्य केली आहे. मराठा उपसमितीने हैदराबाद गॅझेट मान्य असल्याचे जाहीर केले. या गॅझेटची अंमलबजावणी करण्यासाठीचा जीआर काढला जाणार असल्याचे समितीने कबूल केले आहे.

गावातील, नात्यातील किंवा कुळातील व्यक्तींना त्यांची चौकशी करुन कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल असा निर्णय मराठा उपसमितीने मनोज जरांगे पाटील आणि असंख्य मराठा बांधवांच्या समोर मान्य केला. लवकरच हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी होईल असेही समितीने मान्य केले. मनोज जरांगे यांच्या मागणीतील हैदराबाद गॅझेट नेमकं काय आहे?

हैदराबाद गॅझेट म्हणजे काय?

तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी या जातीला कापू नावाने देखील ओळखले जात आहे. या कुणबी किंवा कापू जातीचा प्रमुख व्यवसाय शेती करणे असा होता. हैदराबाद गॅझेटियरमध्ये कुणबी किंवा कापू अशा नोंदी सापडतात. मराठा आरक्षणासाठीचा संदर्भासाठी वापरल्या जाणाऱ्या आणि अभ्यासकांनी दिलेल्या डॉक्युमेंटनुसार, 'इम्पिरीयल गॅझेटीअर ऑफ इंडिया' या नावाचे कागदपत्रक आहे. यावर 'प्रोवींशीयल सिरीज, हैद्राबाद स्टेट 1901' असा उल्लेख आढळतो.

ब्रिटीशकालीन कागदपत्रामध्ये त्यावेळेच्या हैदराबाद स्टेटच्या जनगणनेची माहिती आहे. यामध्ये तेव्हाची शहरे, गावे, गावांमधील लोकसंख्या, त्यांतील जनगणना, शहरातील परिस्थिती यांची आकडेवारी, शेती, नदी या सर्व गोष्टींची विभागवार माहिती नमूद करण्यात आलेली आहे. यात विविध जिल्ह्याची विभागांनुसार माहिती आहे. यात औरंगाबाद जिल्ह्याचे पान आहे. या पानाच्या शेवटील भागात दहा तालुक्यांचा उल्लेख आढळतो.

पानावर The agricultural castes include the Maratha kunbis 2,57,000, also Sindes 15,900, Banjaras 8,900, Kolis 7,000, Maratha Holkar 5,800. अशा प्रकारे काही जातींचा उल्लेख मिळतो. त्यात जातींच्या लोकसंख्या नमूद केल्याचे देखील पाहायला मिळते. औरंगाबाद विभागात परभणी जिल्ह्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. याचा आधार अथवा संदर्भ घेतला जात असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पूर ओसरल्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उन्हात वाळवली ओली झालेली कागदपत्रे

Rupali Bhosle: निळी साडी अन् केसात गुलाबाचं फूल, रूपालीचं सौंदर्य नजर हटणार नाही

Face Care Tips: ग्लोइंग अन् हेल्दी स्कीनसाठी आजच बदला 'या' सवयी, अन्यथा त्वचा होईल खराब

Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

SCROLL FOR NEXT