Manoj Jarange Patil Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange : जरांगेंचा पुन्हा नवा अल्टिमेटम; उपोषण केलं, पदरात काय पडलं?

Manoj Jarange New Ultimatum : मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगेंनी आंदोलनाच्या वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 28 सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय़ न घेतल्यास 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्धार जरांगेंनी केलाय.

Tanmay Tillu

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगेंनी आंदोलनाच्या वर्षपूर्तीच्या मुहुर्तावर पुन्हा एकदा सरकारला आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. 28 सप्टेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय़ न घेतल्यास 29 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाचा निर्धार जरांगेंनी केलाय. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असं त्यांनी जाहीर केलं. मात्र मनोज जरांगे यांच्या या निर्णयाला आंतरवाली सराटीतल्या मराठा आंदोलकांनी विरोध करत उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केलीय.

मराठा आरक्षणासाठी सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला वर्ष झाले. मात्र कुणबी दाखल्यांव्यतिरीक्त जरांगेंच्या हाती काही लागलेलं नाही. ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी म्हणून जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मधून आंदोलन सुरू केलं होतं.

या आंदोलनाची वर्षपूर्ती झाल्याच्या निमित्तानं मनोज जरांगेंनी गोदापट्ट्यातील 123 गावांच्या आंदोलक समन्वयकांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली.

गेल्या वर्षभरात जरांगेंनी अनेक अल्टीमेटम सरकारला दिले आणि सरकारला घामही फोडला. मात्र जरांगेंच्या हाती वर्षभरात कुणबी दाखल्यांखेरीज बाकी काहीही लागलेलं नाही..आता ऐन विधानसभेच्या तोंडावर जरांगे पुन्हा सरकारला अल्टीमेटम देतायत. त्यामुळे यंदा सरकार झुकणार की जरांगे अल्टीमेटमवर अल्टिमेटम सुरूच राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT