MANOJ JARANGE TO BEGIN INDEFINITE HUNGER STRIKE, WARNS OF MARCH TO VARSHA saam tv
महाराष्ट्र

मनोज जरांगे 'वर्षा'वर धडकणार; 40 लाख गाड्या, 6 कोटी मराठे मुंबईत येणार

Maratha Reservation Protest: जरांगे आंतरवाली सराटीत उद्यापासून आमरण उपोषण करत आहेत. मात्र आंतरवालीतून थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर धडक देणार असल्याचा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिलाय. किती गाड्या आणि किती मराठे मुंबईत दाखल होणार? सरकारला अडचणीत आणण्यासाठी जरांगेंनी काय रणनीती आखलीय? पाहूयात विशेष रिपोर्ट........

Suprim Maskar

ऐकलतं...मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकाराला आंदोलनाचा इशारा दिला....जरांगेंनी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारत अंतरवाली सराटीत 29 ऑगस्टपासून आमरण उपोषणाची हाक दिलीय... त्यामुळे उपोषणाच्या पार्श्वभूमीवर गावकऱ्यांनीही जोरदार तयारी सुरु केलीय... सामच्या प्रतिनिधीनं आंदोलनस्थळावरून थेट आढावा घेतलाय...

एकीकडे अंतरवालीत उपोषणाची तयारी सुरु असतानाच जरागेंनी मराठ्यांना चलो मुंबईचाही नारा दिलाय... मुंबईत जाण्याचं ठरल्यावर, आम्हाला रोखल्यास सरकारला ते जड जाईल असा इशारा देत जरांगे नेमकं काय म्हणाले ऐका.... दुसरीकडे मुंबईत आल्यास थेट वर्षावर धडकणार असल्याचा निर्धार जरागेंनी केलाय. त्यामुळे संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता आहे. तर शिंदे फडणवीसांचं ऐकून मंत्र्यांनी मराठ्यांच्या लेकराबाळांचं वाटोळं करू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान जरांगेंच्या इशाऱ्यावर महायुतीमधील नेत्यांनी काय भूमिका घेतलीय...ऐका...

मंत्र्यांच्या शिष्टमंडळानं यापूर्वीच जरांगेंशी आंतरवालीत जाऊन चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. जरांगेंचं उपोषण काही तासांवर येऊन ठेपलेलं असताना सरकार जरांगेंचं मन वळवण्यासाठी काय रणनीती आखणार? त्यात सरकार यशस्वी होणार की आंतरवालीतून पुन्हा एकदा जरांगे मुंबईकडे कूच करून वर्षावर ध़डक देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय़.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT