Maratha quota activist Manoj Jarange addressing supporters as he announces guerrilla strategy for Azad Maidan protest in Mumbai. Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा ‘गनिमी कावा’

Manoj Jarange Maratha Protest Ganimikava Strategy: मनोज जरांगेंनी आझाद मैदानातील आंदोलनात गनिमी काव्याची रणनीती आखलीय.. मात्र जरांगेंचा आंदोलनासाठी गनिमी कावा नेमका कसा असणार आहे?

Bharat Mohalkar

आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी आणि 5 हजार आंदोलकांच्या अटीशर्ती घालण्यात आल्यात.. मात्र हा मराठ्यांचा अपमान आहे, असं म्हणत जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलंय... आता सरकारच्या नाकात दम आणण्यासाठी 5 हजारांचा फॉर्म्युला देत जरांगेंनी गनिमी काव्याची रणनीती आखलीय...

मराठा आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार करत महिनाभराचा किराणा आणि साहित्य सोबत घेण्याचं आवाहन केलंय... मात्र आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी दिल्याने जरांगेंनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच जबाबदार धरलंय....

दुसरीकडे कबुतराच्या आंदोलनाला एक न्याय आणि जरांगेंना वेगळा न्याय का? असा सवाल करुन राऊतांनीही सरकारची कोंडी केलीय...आता जरांगे शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करुन चाकण, तळेगाव, लोणावळा, वाशीमार्ग येत आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.. त्यामुळे परवानगीचा मुद्दा सरकारवरच शेकण्याची शक्यता असल्याने सरकार त्यावर फेरविचार करणार की जरांगें मुंबईत पोहचण्याआधीच आंदोलनावर तोडगा काढणार? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT