मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा मैदानात उतरत सरकारविरोधात एल्गार पुकारलाय... 29 ऑगस्टला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत.. मात्र त्याआधी संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत जरांगेंनी मराठा आंदोलनाची दिशा ठरवलीय.. तसचं 27 ऑगस्टची डेडलाईन देत जरांगेंनी थेट सरकारला आव्हान दिलयं..
प्रत्येकानं किमान 500 मराठ्यांना फोन करा आणि त्यांना आंदोलनासाठी मुंबईत येण्याची विनंती करा... ग्रामपंचायत सदस्य आणि इतर लोकप्रतिनिधींनीना आंदोलनात सहभागी होण्यास सांगा
आंदोलनासाठी आले नाहीत तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना पाडा
असंही जरांगेंनी सांगितलं असून
छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक घरातून एक तरी गाडी मुंबईत नेण्यासाठी तयार ठेवा.. एवढंच नाही तर 10 ते 15 दिवस आंदोलनासाठी मुंबईत राहण्याची तयारी ठेवण्यास ही सांगितलय..
दरम्यान जरांगेंनी पुन्हा मराठा आंदोलकांच्या मागण्यांची सरकारला आठवण करून दिलीय.. याआधीही मनोज जरांगेंनी 26 जानेवारी 2024 मध्ये आंतरवली सराटी ते वाशी असा लाँग मार्च काढला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचा ड्राफ्ट जरांगेंच्या हाती सोपवून आरक्षणाचं आश्वासन दिलं होतं. ज्यामुळे जरांगेंनी माघार घेतली..मात्र यावेळची लढाई ही आरपारची असणार आहे.. त्यामुळे ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईतील मराठा आंदोलन यावेळी मागे फिरणार नाही, हे निश्चित...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.