MANOJ JARANGE FACES FINANCIAL ALLEGATIONS; WADETTIWAR CLAIMS ₹1,400 CRORE CONTRACT EVIDENCE saam tv
महाराष्ट्र

जरांगेंना डिफेंडर, 2 लाखांचा फोन देणारे कोण? 'माझ्याकडे 1400 कोटींच्या कंत्राटाचे पुरावे'

Manoj Jarange Controversy: मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या निकटवर्तीयांच्या मालमत्तेवरून वादात सापडले आहेत. त्यांच्या माजी सहकाऱ्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर १४०० रुपयांच्या कंत्राटाचे पुरावे असल्याचा दावा एका बड्या नेत्यानं केलाय. नेमके काय आहेत आरोप? आणि कोणत्या नेत्याकडे आहेत पुरावे? यावरचा हा विशेष् रिपोर्ट......

Suprim Maskar

मराठा आरक्षणावरून गेल्या तीन वर्षांपासून सरकारला जेरीस आणणाऱ्या जरांगेंनी यावेळी मुंबईची वाट धरली खरी मात्र पहिल्याच मुक्कामात जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा अल्टिमेटम देत माघार घेतली.. त्यामुळे आता जरांगेंभोवती राजकीय आणि आर्थिक आरोपांचं मोहोळ उठू लागलयं...एकीकडे सहकाऱ्याला कंत्राट न मिळाल्यानं जरांगेंनी आंदोलन केल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला. तर दुसरीकडे जरांगेंच्या माजी सहाकाऱ्यानेच जरांगेंवर आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप केलेत... जरांगेंना डिफेंडर देणारे भोसले कोण?, असा अजय बारस्कर यांनी केलाय.. तर मंत्री शिरसाटांना टार्गेट करण्यासाठी अब्दुल सत्तारांकडून 6 कोटी घेतल्याचा आरोप जरांगेवर अमोल खुणेंनी केलाय...

जरांगेंना डिफेंडर देणारे सुभाष भोसले नेमके कोण आणि कुठले आहेत? ते पाहूयात...

सुभाष भोसले हे सांगोला तालुक्यातील चीक महूद येथील व्यापारी आणि प्रगतशील शेतकरी आहेत..

जरांगेंच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावेळी भोसलेंनी जरांगेंना डिफेंडर दिली

जरांगेंना दिलेली डिफेंडर ही गाडी 1 कोटी 90 लाख रुपयाची असून यासाठी भोसलेंनी दीड कोटीचे कर्ज घेतलं

भोसलेंचे कुटुंबीय सोने- चांदीचा व्यवसायही करतात

दरम्यान जरांगेंच्या माजी सहकाऱ्यांकडूनचं जरांगेंवर आर्थिक व्यवहाराचे गंभीर आरोप करण्यात आल्यानं जरांगे समर्थकही आक्रमक झालेत.. यापुढे जरांगेंवर आरोप करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार, असा हल्लाबोल गंगाधर काळकुटेंनी केलाय... दुसरीकडे 1400 कोटींचं कंत्राट रद्द झाल्यानं जरांगेंनी आदोलन केल्याचा आंरोप वडेट्टीवारांनी केला होता.. त्यावरून पुरावे असल्यास सादर करण्याचं आव्हान मंत्री उदय सामंतांनी दिलं. मात्र फुसकं आव्हानं कोणी देऊ नये माझ्या मोबाईमध्ये पुरावे आहेत असं प्रतिआव्हान वडेट्टीवारांनी दिलयं...

आरक्षणासारख्या संवेदनशील मुद्द्यावर सुरू असलेल्या आंदोलनात आता कंत्राटे आणि आर्थिक व्यवहारांमुळे नवा वाद पेटलाय...खरचं जरांगेंच्या सहकाऱ्याला कोट्यवधीचं कंत्राट न मिळाल्य़ानं जरांगेंनी आंदोलन केलं का? जरांगेंकडे 2 लाखांचा फोन कुठून आला? जरांगेंना भोसलेंनी डिफेंडर देण्यामागे काय हेतू आहे? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतायत.. त्यामुळे या सर्व आरोपांवर जरांगे पाटील काय प्रत्युत्तर देतात? याकडे मराठा समर्थकांचं लक्ष लागलयं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT