Manoj Jarange files third application for Mumbai protest permission 
महाराष्ट्र

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

Maratha Reservation Stir:मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज केला आहे. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी मान्य करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Bharat Jadhav

  • मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा परवानगी मागितली आहे.

  • मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे ठाम असल्याचे अर्जात नमूद आहे.

  • मुंबई पोलिसांनी यापूर्वी दोन अर्जांना परवानगी नाकारली होती.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूय. सरकारनं मागण्या मान्य केल्या नसल्यानं जरांगेंनी चलो मुंबईचा नारा दिलाय.परंतु मुंबई पोलिसांनी त्यांना आंदोलनासाठी परवानगी दिली नाहीये. पोलिसांनी दोनदा परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगेंनी तिसऱ्यांदा परवानगीचा अर्ज केलाय. पोलिसांनी घातलेल्या सर्व अटी जरांगेंनी मान्य केल्या आहेत.

दरम्यान,मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याच्या निर्णयावर जरांगे पाटील ठाम आहेत. या नव्या अर्जामध्ये पोलिसांनी यापूर्वी ज्या कारणांवरून परवानगी नाकारली होती, त्या सर्व अटींचं पालन करण्याची तयारी मनोज जरांगे पाटील यांनी दर्शवली आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आझाद मैदानात शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचं अर्जात नमूद करण्यात आलं आहे.

आंदोलन पूर्णपणे लोकशाही आणि घटनात्मक चौकटीत राहून करण्यात येईल. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची आयोजकांकडून पूर्ण काळजी घेतली जाईल,असं अर्जात म्हटलंय.

मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी पोलिसांनी याआधी दोनवेळा परवानगी नाकारलीय. आता तिसऱ्यांदा अर्ज करताना पोलिसांनी घातलेल्या अटी मान्य करण्याची तयारी जरांगे पाटील यांनी दर्शवलीय.या अर्जामध्ये एकूण २० अटी मान्य करण्यात आल्या आहेत.

अर्जातील महत्त्वाच्या अटींनुसार, कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने मागणी केल्यास आंदोलनाची परवानगी दाखवण्यासाठी तिची मूळ प्रत सोबत बाळगण्यात येणार आहे. तसेच अर्जात नमूद करण्यात आलेल्या आंदोलकांच्या संख्येची मर्यादा कायम ठेवली जाईल, असंही स्पष्ट करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT