Manoj Jarange Patil  Saam Tv
महाराष्ट्र

Manoj Jarange: मुंबईतील ३ मैदाने आम्हालाच लागतील, सरकारही परवानगी देईल; मनोज जरांगेंनी व्यक्त केली अपेक्षा

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील. त्यासाठी सरकारही परवानगी देईल,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मनोज जरांगे यांच्या अपेक्षेनंतर सरकार काय निर्णय घेणार, हे पाहावे लागेल.

लक्ष्मण सोळुंके

Manoj Jarange Patil News:

मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत 20 जानेवारी रोजी उपोषण करणार असल्याची घोषणा केली. मुंबईत या उपोषणावेळी ३ कोटी मराठा आंदोलक येईल, असा दावा देखील जरांगे यांनी केला आहे. त्यानंतर ओबीसी समाजानेही २० जानेवारीला आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मात्र, याचदरम्यान जरांगे यांनी मुंबईत आम्हाला तीन मैदाने लागतील. त्यासाठी सरकारही परवानगी देईल,अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे म्हणाले, 'मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळांनी मुंबईतील मैदानांची पाहणी केली आहे. त्यानंतर मुंबईत जाणाऱ्या मराठा आंदोलकांची संख्या मोठी आहे, त्यामुळे आम्हाला तीन मैदाने लागतील. मुंबईतील शिवाजीपार्क, बीकेसी आणि आझाद मैदान हे तीन मैदाने लागतील. मात्र, आमरण उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोन्ही पैकी एका मैदानात होईल'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जरांगे पाटील फडणवीसांवर काय म्हणाले?

'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल आम्हाला राग नाही आहे. ते मराठा आरक्षणासाठी काम करत आहेत,असं स्पष्टीकरण जरांगे यांनी दिलं.

दरम्यान, मनोज जरांगे हे येत्या 4 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत गोदा पट्ट्यातील 123 गावांचा दौरा करणार आहेत. यावेळी ते मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांशी गाठीभेटी करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT