Ramdas Kadam Latest News 
महाराष्ट्र

शिंदेंना संपवण्यासाठी भाजपचं षडयंत्र, २ आमदारांची नावे सांगितली; कदमांनी दाखवलं जरांगे-भाजप कनेक्शन

Ramdas Kadam Latest News : रामदास कदम यांनी एकनाथ शिंदेंना बदनाम करण्यासाठी कट रचल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली. प्रसाद लाड यांच्यासोबतच्या जरांगेंच्या भेटीचे फोटो दाखवत त्यांनी भाजप कनेक्शनवर प्रश्न उपस्थित केले. या आरोपांवर प्रसाद लाड यांनीही प्रत्युत्तर दिले.

Namdeo Kumbhar

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी घेतलेली पत्रकार परिषदेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती. यावर प्रत्युत्तर देताना रामदास कदम यांनी थेट भाजपवर आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी भाजपने कुणाकडून सुपारी घेतली आहे का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

कदम म्हणाले की, "जरांगे हे आमचे मित्र असलेल्या भाजपच्या प्रसाद लाड यांच्यासोबत जेवण करत आहेत." इतकेच नव्हे, तर त्यांनी प्रसाद लाड यांच्यासोबतच्या जरांगे यांच्या भेटीचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले. यावरून मराठा आरक्षणाचा लढा देणारे जरांगे आणि भाजपचे नेते एकत्र येऊन शिंदेंविरोधात कट रचत असल्याचा दावा त्यांनी केला. या संपूर्ण घडामोडीत भाजप नेते प्रवीण दरेकर यांचेही नाव पुढे आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

भाजप नेते प्रसाद लाड आणि जरांगेंचे फोटो आले समोर

या पत्रकार परिषदेत रामदास कदम यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका करत गंभीर संशय व्यक्त केला. मनोज जरांगे पाटील सर्वांची फसवणूक करत आहेत, ते कशाला नाटके करत आहेत?असा सवाल करत कदमांनी थेट जरांगे आणि भाजप नेत्यांच्या भेटीचा मुद्दा पुढे आणला. प्रसाद लाड यांनी रामदास कदमांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. रामदास कदमांनी संजय राऊतांसारखे वागू नये, असा सल्ला दिला.

जरांगेच्या जवळच्या माणसानेच दिली ऑडिओ क्लिप

जरांगे यांनी व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप खरी असल्याचा दावा कदम यांनीकेला. ते म्हणाले की, "जरांगेच्या जवळच्या लोकांनीच मला ती ऑडिओ क्लिप दिली आहे. वेळ पडल्यास मी त्यांचे नावही उघड करेन." जरांगे आणि भाजपचे नेते एकत्र येऊन एकनाथ शिंदे यांच्याविरोधात षडयंत्र रचत असल्याचा दावा केला.

रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. "ही ऑडिओ क्लिप रामदास कदम यांच्याकडे आधी कशी आली? त्यांना त्याची वेळ आणि दिवस कसा माहिती होता? तेच तर फुटीर नाहीत ना?" असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला होता. याला उत्तर देताना रामदास कदम यांनी जरांगे यांना गंभीर इशारा दिला. तसेच, सुपारी घेऊन पाठीत खंजीर खुपसण्याचे काम जरांगे करत असल्याचा थेट हल्लाबोल कदमांनी केला. याशिवाय, एकनाथ शिंदेंना संपवण्याचा विडा भाजपने उचलला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर ५०० कोटी रुपयांचा आरोप करत एक ऑडिओ बॉम्ब टाकला होता, ज्यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. या प्रकरणी जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले असून, "हळूहळू जरांगेची सगळी बंडखोरी समोर येत आहे," असे ते म्हणाले. तसेच, जरांगेनी ऐकवलेली ऑडिओ क्लिप 'एआय' (AI) नाही, असा दावाही त्यांनी केला. मराठा समाजच तुम्हाला उद्ध्वस्त करेल, असा इशाराही रामदास कदम यांनी यावेळी दिला.

पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना पत्र लिहून चौकशीची मागणी

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंना संपवण्यासाठी भाजपमधून नेमका कुणी विडा उचलला आहे, हे समोर आले पाहिजे, अशी मागणी रामदास कदम यांनी केली. शिंदेंना बदनाम करण्यासाठी कोण कट रचत आहे, याची सखोल चौकशी झालीच पाहिजे, यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे.

"शिंदेंना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांना संपवण्यासाठी जर कुणाकडून सुपारी घेतली गेली असेल, तर मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि तुमची साथ सोडणार नाही," असा सज्जड इशारा रामदास कदम यांनी यावेळी जरांगेंनी दिला. या पत्रकार परिषदेमुळे महायुतीमधील मित्रपक्षांमधील अंतर्गत संघर्ष आणि अस्वस्थता चव्हाट्यावर आली असून, आगामी काळात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Blouse Designs: महिलांसाठी काठपदराच्या साडीवर स्टायलिश ब्लाऊज, लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Maharashtra News Live Update: महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचा विश्वास

Green Garlic : जेवणाची चव वाढवण्यासोबतच, जाणून घ्या लसणाची पात खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Celebrity Bomb Threat: अमिताभ बच्चन यांचे घर आणि दिलजीत दोसांझचा कॉन्सर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, मुंबईत धमकीच्या ई-मेलने खळबळ

Manoj Jarange: आंदोलन मागे घेण्यासाठी ५०० कोटींची ऑफर आली होती का? मनोज जरांगेंनी सांगितले सत्य

SCROLL FOR NEXT