Manoj Jarange Patil Saam tv
महाराष्ट्र

Manoj Jarange : मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? मनोज जरांगेंचा गंभीर आरोप, VIDEO

Manoj Jarange News : मराठा आंदोलक जरांगे आणि ओबीसी संघटनांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. कारण ओबीसी संघटनांनी मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट केल्य़ाचा खळबळजनक आरोप जरांगेंनी केलाय....गोव्यातल्या ओबीसी शिबिरात नेमकं काय घडलं...पाहूयात स्पेशल रिपोर्ट...

Suprim Maskar

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली..आणि साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं ते गोव्यातल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनानं...मात्र त्यानंतर आता हेच ओबीसी अधिवेशन दुसऱ्याच कारणासाठी वादात सापडलंय. काऱण मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, असा आरोप केलाय. इतकचं काय तर आंदोलनात काही घडल्यास थेट फडणवीसचं जबाबदार असतील, असंही जरांगे म्हणालेत.. तर दुसरीकडे जरांगेंनी केलेले आरोप ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी फेटाळलेत...

दरम्यान 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जरांगेंच्या कोणत्या मागण्यात आहेत पाहूयात..

मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा

हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा

आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा

मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या

मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या

मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी जरांगे मुंबईत धडकणार आहेत. त्याआधीच जरांगेंनी ओबीसींना टार्गेट केलयं. त्यामुळे ओबीसी महासंघावर जरांगेंनी आरोप केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा पेटणार का? जरांगेंच्या मागण्या सरकार मान्य करणार का? जरांगेंच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढणार की जरांगेंच्या मोर्चानं सत्ताधाऱ्यांची पुन्हा कोंडी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anger Control Tips: पटकन राग येतो अन् चिडचिड होतेय? ट्राय करा 'हा' उपाय, लगेच मन होईल शांत

Maharashtra Live News Update: नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात

सरकारी महिला कर्मचाऱ्यासोबत रिक्षा चालकाचे गैरकृत्य; नको तिथे स्पर्श अन् शिवीगाळ, पोलिसांनाही धमकावलं

Akola : पाण्यात पडलेल्या बकरीला वाचविले पण जीव गमावला; नदीतील डबक्यात बुडून एकाचा मृत्यू

Vasai - Virar MSRTC : कर्मचाऱ्यांना पगार नाही, वसई-विरार मनपाची बससेवा ठप्प; ऐन गणेशोत्सवात नागरिकांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT