Marriage Manmad News
Marriage Manmad News Saam tv
महाराष्ट्र

Manmad News: मित्र असावा तर असा..मित्राच्‍या मुलीची इच्‍छा केली पुर्ण; नवरदेव- नवरीला हेलिकॅप्टरमधून आणले

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनवणे

मनमाड (नाशिक) : मुलाचे किंवा मुलीचे लग्‍न असले तर हौस भागविण्यासाठी काहीही केले जाते. परंतु, आपल्‍या (Manmad) मित्राच्‍या मुलीची इच्‍छा पुर्ण करण्यासाठी मित्राला शब्‍द दिला होता. तो शब्‍द पाळत विवाह (Marriage) सोहळ्याच्‍या दिवशी नवरदेव व नवरीला हेलिकॅप्‍टरमधून आणत वरात काढली. (Tajya Batmya)

मित्राला दिलेला शब्द पूर्ण करत बाराबलुतेदार संघटनेचे संस्थापक व दानशूर व्यक्ती बंडू काका बच्छाव यांनी आदिवासी मित्राच्या मुलीची ईच्छा पूर्ण करत थेट नवरदेव नवरीला हेलिकॅप्टरमधून आणले. त्यांची हेलिपॅडवरून वाजत गाजत घोडा गाडीतून वरात काढत मित्राला दिलेला शब्द पूर्ण केला. यामुळे गावात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

बिदाई देखील हेलिकॅप्‍टरमधूनच

हेलिपेडवरून नवरदेव-नवरीची वरात लग्नस्थळी पोहचल्यावर लग्न सोहळ्यास्थळी पोहचेल. येथे लग्‍न आटोपून पुन्हा तिची बिदाई हेलिकॅप्टरमधून करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हेलिकॅप्टरमध्ये धर्मगुरुसुद्धा त्यांच्या समवेत होते. सर्वधर्म समभाव सांभाळत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या बाराबलुतेदार संघटनेच्या माध्यमातून आज होत असलेल्या विवाह सोहळ्याची मात्र जोरदार चर्चा होत आहे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

Maharashtra Election: भाजप-मनसेच्या युतीत शिवसेनेचा खोडा; बाळा नांदगावकरांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics 2024 : मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली?; निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

SCROLL FOR NEXT