Manmad Fire News Saam Tv
महाराष्ट्र

Breaking News : शिर्डीला दर्शनाला जाताना कारला भीषण आग; चालकाच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

मनमाड येथून शिर्डीला जात असलेल्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय सोनावणे

Manmad Fire News : मनमाडमधून कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. मनमाड येथून शिर्डीला जात असलेल्या चारचाकी वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे. मनमाड-येवला रस्त्यावर अंकाई पाटीजवळ घटना घडली आहे. या घटेनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मनमाड येथून शिर्डीला जात असलेली कारल आग लागल्याची घटना घडली आहे. मनमाड-येवला (Manmad) रस्त्यावर अंकाई पाटी जवळ घडली घटना घडली आहे. कारला आग लागल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे कारमधील प्रवाशांचा जीव वाचला आहे.

नेमकं काय घडलं?

मनमाड-येवला रस्त्यावरून कार शिर्डीला जात होती. त्यावेळी गाडीतून धूर येत असल्याचे चालकाचे लक्षात आले. त्यानंतर गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. धूर येताच प्रवाशी गाडीच्या खाली उतरले. धूर निघाल्यानंतर प्रवाशांमध्ये एकच भीती पसरली. त्यानंतर कारने पेट घेण्यास सुरुवात केली. या कारला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Maharashtra Latest News)

कारला आग लागल्यानंतर प्रवाशांचे सामान आणि गाडी जळून खाक झाली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे. सुदैवाने सर्व प्रवाशी सुरक्षित आहे. सुट्ट्यामुळे शिर्डीला साईंच्या दर्शनाला रोज गर्दी होत आहे. ही कार देखील शिर्डीला साईंच्या दर्शनाला जात होती. मात्र, त्याआधीच मनमाड-येवला रस्त्यावरून जाणाऱ्या कारला आग लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

SCROLL FOR NEXT