महाराष्ट्र

मंत्री माणिकराव कोकाटेंच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार; मंत्रीपदही जाण्याची शक्यता

Manikrao Kokate in Trouble : राज्याचे क्रीडामंत्री आरोपी माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी व दहा हजारांचा दंडाची शिक्षा नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी सुनावली. शिक्षेची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एम.बदर यांनी अतिरक्त मुख्य न्यायदंडाधिकारी रुपाली नरवाडीया यांना दिलेत.

Bharat Jadhav

  • शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षे आणि 10 हजार दंडाची शिक्षा

  • आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्या.

  • जिल्हा सत्र न्यायाधीश पी एम बदर यांनी सुनावली शिक्षा

महायुती सरकारचे क्रीडा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत. शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटे यांना अटक होण्याची शक्यता आहे. अटकेच्या शक्यतेसह कोकाटेंचे मंत्रीपद देखील धोक्यात आले आहे. कारण प्रथम वर्ग न्यायालयाने दिलेली शिक्षा, जिल्हा सत्र न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलीय.

आर्थिक उत्पन्नाचे बनावट दस्तावेज तयार करून मुख्यमंत्र्यांच्या १० टक्के राखीव कोट्यातून सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. कोकाटे यांनी नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातील सदनिका लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यातील २० तारखेला शिक्षा ठोठावली होती. मात्र त्यानंतर त्यांना जामीनदेखील मंजूर झाला होता.

दिवंगत माजी राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार करत फसवणूक केल्याचा आरोप दिघोळे यांनी केला होता. त्यावरून कोकाटेंविरुद्धात खटला सुरू होता. कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका घेताना स्वतःच्या नावावर कुठेही सदनिका नसल्याचे प्रतिज्ञापत्र व आवश्यक माहिती सादर करावी लागते.

असे असताना क्रीडामंत्री कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी कागदपत्रे सादर करून शहरातील कॅनडा कॉर्नर भागातील निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून दोन सदनिका प्राप्त केल्या होत्या. या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतरांनी मिळवल्या. त्याचा वापर कोकाटे बंधूंकडून केला जात होता.

या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर १९९७ मध्ये जिल्हा प्रशासनाने चौकशी केली. त्यानंतर माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू विजय कोकाटे यांच्यासह चार जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचा निकाल २९ वर्षांनी लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT