Former Maharashtra minister Manikrao Kokate during a public event amid the housing scam controversy. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Manikrao Kokate Housing Scam Case: सदनिका घोटाळ्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलाय... मात्र कोकाटे या वादाच्या चक्रव्युहात कसे अडकले? कोकाटेंचं मंत्रीपद गेलं आता आमदारकीचं काय?

Suprim Maskar

नाशिकच्या राजकारणातील बडं प्रस्थ असलेले माणिकराव कोकाटे अखेर वादाच्या चक्रव्यूहात पूर्णपणे अडकले.. १९९५ साली येवलेकर मळा परिसरातील सरकारी योजनेतील सदनिका मिळवण्यासाठी कोकाटे बंधूंनी उत्पन्नाचे खोटे दाखले सादर केले होते.. या प्रकरणात नाशिक न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावलीय. मात्र त्यातही सत्र न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटेंच्या पायाखालची वाळूच सरकलीय. कोकाटे या चक्रव्युहात नेमकं का आणि कसे अडकले?

कोकाटेंना नंदुरबारचे पालकमंत्रिपद मिळाले होते, मात्र त्यांचा डोळा नाशिकच्या 'किंगमेकर' खुर्चीवर होता. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे आमदार जास्त असल्याने कोकाटे तिथल्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र, यामुळे नाशिकवर वर्चस्व गाजवणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांची आणि राष्ट्रवादीतीलच त्यांच्या विरोधकांची गोची झाली होती. त्यानंतर कोकाटे विधीमंडळात रम्मी खेळतानाच्या प्रकरणात अडकले... आणि त्यानंतर सदनिका गैरव्यवहार प्रकरणात कोकाटेचं नाशिकच्या पालकमंत्रिपदाचं स्वप्न अपूर्ण राहिलं...

खर तर माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळात आल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहिलेत. वादग्रस्त विधानानंतर रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांचं कृषिमंत्रिपद गेलं.. त्यावेळीच विरोधकांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली होती.. मात्र त्यावेळी जीवनदान मिळालेल्या कोकाटेच्या भविष्यावर सदनिका घोटाळ्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय... धनंजय मुंडेंनंतर कोकाटे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे वादग्रस्त कारणांमुळे राजीनामा देणारे दुसरे मंत्री ठरलेत...कोकाटेंवरील या कारवाईमुळे नाशिकमध्ये महायुतीत संघर्षाचा नवा अध्याय सुरु होईल, हे निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Winter Temprature : राज्यात तापमानात चढ-उतार! 'या' जिल्ह्यांत पारा १० अंशाच्या खाली; वाचा आजचे हवामान कसे असेल?

Maharashtra Live News Update: भाजप-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार- मुरलीधर मोहोळ

Bank Holidays: कामाची बातमी! देशभरात बँकांना सलग ५ दिवस सुट्टी; कारण काय?

Mangal-Budh Yuti: मंगळ-बुध ग्रहाची होणार महायुती; 'या' राशींची तिजोरी तुडुंब भरणार

Success Story: इंटरव्ह्यूआधी वडिलांचे निधन, आभाळाएवढं दुःख तरी मानली नाही हार; शुभम राय यांनी ६व्या प्रयत्नात क्रॅक केली MPPSC

SCROLL FOR NEXT