Manikrao Kokate  saam tv
महाराष्ट्र

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे आणखी कचाट्यात; शिक्षा स्थगितीविरोधात हायकोर्टात याचिका

Legal Battle for Manikrao Kokate: मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. पण आता याविरोधात माजी न्यायाधीशाने उच्च न्यायालयात धाव घेतली.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोकाटे यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी १८ मार्च रोजी उच्च न्यायालयामध्ये पहिली सुनावणी होणार आहे. माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात सतीश वाणी या वकील तथा माजी न्यायाधीशांनी याचिका दाखल केली आहे.

सतीश वाणी यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात याचिका दाखल केली. त्यांनी न्यायालयाने कोकाटेंच्या शिक्षेवर स्थगिती दिल्यावर आक्षेप घेत ही याचिका दाखल केली. त्यांनी सांगितले की, 'वाईट लोकांची वाईट खेळी आहे. घाईघाईत कोकाटे यांचा निकाल दिला आहे. इतर लोकांना बाजू मांडू दिली नाही. सुनील केदार यांच्याबाबत फडके मॅडमने सांगितले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एकीकडे खोटं सांगून सदनिका घेतात. दुसरीकडे ३० लाख वाटायला लागतात त्यासाठी बंदूक लायसन्स मागितले.'

सतीश वाणी यांनी पुढे सांगितले की, 'कोकाटे यांना शिक्षा दिली आहे तर त्याला स्थगिती कशी दिली.' असा सवाल सतीश वाणी यांनी उपस्थित केला आहे. 'दंड तर भरलेला आहेच ना? कारवाई व्हायला पाहिजे होती. लिली थॉमसन यांच्याप्रमाणे राज्यपाल कारवाई करणार की नाही. मी स्वतः राज्यपाल यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहे. कोकाटे यांचे गोव्याला हॉटेल आहेत. ३० लाख महिन्याला वाटतात.'

तसचं, 'आम्ही निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलोय. चुकीचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालाशी आम्ही सहमत नाही. सुनील केदार प्रकरणात २१ प्रकरणाचे निर्णय आहे. २ वर्षापेक्षा जास्त शिक्षा असेल त्यांना आमदारकीला उभं करू नये असे फाळके मॅडमने म्हटलं आहे. ज्यांनी निकाल दिला अशा न्यायाधीशाने समाजकार्य करावे. कशाला पगार घेऊन काम करतात. लोक स्टँडी नाही असे आम्हाला सांगितले होते.', असं देखील त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT