एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक आले, चर्चा केली अन् म्हणाले... Saam Tv
महाराष्ट्र

एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक आले, चर्चा केली अन् म्हणाले...

तर यावेळी आपल्या व्यथा सांगताना अनेक कर्मचाऱ्यांना अश्रू देखील अनावर झाले.

विनोद जिरे

बीड जिल्ह्यात गेल्या 29 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करा, ही प्रमुख मागणी घेऊन एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. तर याच संपकरी कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यासाठी, महाराष्ट्राचे एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय महासंचालक, शेखर चन्ने हे आज बीडमध्ये आले होते. त्यांनी बीडमध्ये जवळपास 2 तास कर्मचाऱ्यांसोबत बैठक घेत चर्चा केली आहे. त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर यावेळी आपल्या व्यथा सांगताना अनेक कर्मचाऱ्यांना अश्रू देखील अनावर झाले.

यावेळी शेखर चन्ने म्हणाले, की कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकल्या असून त्यांच्या मागण्या देखील ऐकल्या आहेत. मात्र शासनाने कर्मचाऱ्यांना वाढीव वेतन दिले. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर यावे, त्यांची मागणी आहे की शासनात विलीनीकरण करा. मात्र हे प्रकरण आता कोर्टात आहे, त्यामुळे कर्मचारी आता कामावर येणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे कर्मचारी कामावर येतील. अशी माहिती शेखर चन्ने यांनी बैठक संपल्यानंतर दिली आहे.

दरम्यान महासंचालकांनी एकतर्फी चर्चा केली आहे, आमची मूळ मागणी जी आहे ती सोडून दुसरा काय विषय आहे ? ते सांगा असं ते म्हणत होते. आमचं ऐकून घेतलं नाही, त्यामुळे ही चर्चा केवळ एक तर्फी होती. या बैठकीतून आम्ही समाधानी नसून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. आमचं शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत आम्ही आमचा हा संप सुरूच ठेवू. असा इशारा महासंचालकांच्या बैठकीनंतर आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

Weather Update: अचानक गायब झालेला मान्सून धो धो बरसतोय! कोणत्या जिल्ह्यांना धोका?

Mumbai Crime : तरुणीने डेटिंग ॲपवरून ओळख केली; हॉटेलमध्ये एकटं बोलावलं अन्...; बोरिवलीतील तरुणासोबत घडला भयंकर प्रकार

Maharashtra Live News Update : नाशिकच्या इगतपुरीत दरड कोसळली, आदिवासी पाड्यांचा संपर्क तुटला

Nashik Crime News: नाशिकमध्ये चड्डी गँगचा कहर; घरात घुसून ४ तोळे सोनं लंपास| VIDEO

SCROLL FOR NEXT