जादूटोणा अघोरी विद्या Saam Tv
महाराष्ट्र

BoyFriend GirlFriend: प्रेयसीला वश करण्यासाठी प्रियकराने घेतला अघोरी विद्येचा आधार

Young Man Uses Occult Practices: कोल्हापुरातील एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून अघोरी कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Omkar Sonawane

रणजित माजगावकर, साम टीव्ही

कोल्हापूर: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असते असे म्हणतात. लैला मजनू, रोमि ज्युलियट इथपासून ते ताजमहालच्या बांधकामापर्यंत प्रेमाचे महत्त्व सांगितले जाते. परंतु प्रेयसीला मिळविण्यासाठी प्रियकराने थेट अघोरी विद्येचा आधार घेतल्याचा प्रकार कोल्हापूर येथे उघड झाला आहे.

कोल्हापूर: येथील भुदरगड तालुक्यातील आकुर्डे- महालवाडी दरम्यानच्या कुरण शेतात अज्ञात व्यक्तीकडून अघोरी प्रकार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक तरुणांना या ठिकाणी एका बाभळीच्या झाडाला दाभणाने काही मुलींचे फोटो लटकवलेले आढळले. तसेच लिंबू, काळ्या बाहुल्या आणि अन्य साहित्याचा वापर करून जादूटोण्याचा प्रकार झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे, एका युवतीच्या आई, वडील आणि आजीचे फोटोही झाडावर लावलेले होते.

ही माहिती गावात पसरताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन सर्व साहित्य झाडावरून काढून टाकले. त्यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन करत अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालू नये, असे स्पष्ट केले.

दरम्यान, हा प्रकार एखाद्या तरुणाने मुलीला वश करण्यासाठी केला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. ग्रामस्थांनी अशा प्रकारांवर विश्वास न ठेवावा आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT