नवनीत तापडिया, छत्रपती संभाजीनगर
Chhatrapati Sambhajinagar News: आतापर्यंत आपण अनेक प्रकारच्या चोरी, लुटमार, दरोडा अशा घटना पाहिल्या आणि अनुभवल्या असतील. मात्र आजही माणुसकी आणि ईमानदारी जिवंत आहे हे दाखवणारी एक घटना समोर आलीये. वडापावच्या दुकानावर एका व्यक्तीचे राहिलेले १ लाख रुपये त्याला परत करण्यात आले आहेत.(Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना बिडकिन येथे घडली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या बिडकिन येथील वडापाव सेंटर येथे कामाच्या घाईगडबडीत एक व्यक्ती लाख रुपये विसरला होता. त्याने बँकेतून नुकतेच १ लाख ९२ हजार रुपये काढले होते.
वडापाव सेंटरवर एक पिशवी बेवारस अवस्थेत पडून होती. वडापाव सेंटरवर आलेल्या एका ग्राहकाने पाहिले की, टेबलवर कोणीही नाही मात्र एक पिशवी केव्हाची तिथेच पडली आहे. ही पिशवी कुणाची असावी असा विचार करत त्याने पिशवी पाहिली तेव्हा त्यामध्ये लाखो रुपये आढळले.
हे आपल्याला मिळालेले पैसे आहेत. यावर आपला हक्क आहे, असं न समजता या व्यक्तीने तातडीने वडापाव (Vada Pav) सेंटरच्या मालकाला याची माहिती दिली.त्यानंतर या दोघांनी मूळ मालकाचा शोध घेऊन त्याला त्याचे पैसे परत दिले. या घटनेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.