Malvan Rajkot Shivaji Maharaj Statue x
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : आधी पुतळा, आता चबुतऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्यात पुन्हा भ्रष्टाचार?

Malvan Rajkot Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडले आहे. पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

सिंधुदुर्ग : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजून जमीन खचल्याची माहिती समोर आली आहे. जमिन खचल्याने पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडले आहे. त्यामुळे चबुतऱ्याच्या आजूबाजूचे काम निकृष्ट दर्जाचे आहे हे स्पष्ट झाले आहे.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर यापूर्वी शिवरायांचा ४० फूट उंच पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी कोसळला होता. निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा पुतळा कोसळला असे म्हटले जात आहे. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर महायुती सरकारने गाजावाजात जुन्या पुतळ्याच्या जागेवरच नव्या पुतळा उभारण्याची घोषणा केली. त्यानुसार, थोड्या कालावधीत नवा पुतळा उभारण्यात आला.

मे २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिवरायांच्या नव्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच या नव्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला लागून असलेली जमीन खचल्याचे दिसून आले आहे. या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमुळे प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरु झाल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी असलेल्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन काही प्रमाणात खचली असली, तरीही शिवरायांचा पुतळा सुरक्षित असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नव्या पुतळ्याची एकूण उंची ८३ फूट आहे, तर चबुतऱ्याची उंची १० फूट आहे. नव्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

Maharashtra Live News Update: शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरे शिवतीर्थावर जाणार

Breaking News : ऐन गणेशोत्सवात मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने ६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT