Malvan news ind vs pak Saam Tv
महाराष्ट्र

Malvan News : पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणं भोवलं, मालवणमध्ये परप्रांतीयाच्या भंगार गोदामावर फिरवला बुलडोझर

Malvan : काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान मालवणमध्ये परंप्रातीय भंगार व्यवसायिकांनी भारत विरोधी घोषणा केल्या होत्या. 'पाकिस्तान जिंदाबाद' अशी घोषणाबाजी केल्याप्रकरणी व्यवसायिकांवर प्रशासनाने कारवाई केली.

Yash Shirke

विनायक वंजारे, साम टीव्ही, प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमध्ये भारत विरुद्ध सामना सुरु असताना काही समाजकंटकांनी भारत विरोधी घोषणा दिल्या. घोषणा दिल्या प्रकरणी मालवणच्या आडगाव भागतल्या परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची बांधकामे प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने पाडली. संतप्त नागरिकांनी पाठिंबा दर्शवत कारवाईचे स्वागत केले.

काल चॅम्पियन्स ट्रॉफीचा भारत वि. पाकिस्तानचा सामना दुबईमध्ये खेळला गेला. हा सामना सुरु असताना मालवण शहरातील आडवण भागातील भंगार व्यवसायिकांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. भारताचा कर्णधार रोहित शर्मा बाज झाल्यानंतर त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावरुन मालवणमध्ये वातावरण तापले आहे.

मालवणमधल्या या प्रकरणावर मंत्री निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भंगार व्यवसायिकांची बांधकामे उध्वस्त केल्याची माहिती दिली. ते म्हणाले, 'मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने काल भारत-पाकिस्तान मॅचनंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय व्यावसायिकाला जिल्ह्यातून हाकलून देणारच आहोत. पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करुन टाकला आहे. मालवण नगर परिषद आणि पोलिस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार.'

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा दिल्याने नागरिक संतप्त झाले होते. त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या घोषणाबाजी प्रकरणावरुन मालवणात संताप व्यक्त केला जात आहे. याच्या निषेधार्थ मालवणमधील संतप्त नागरिकांनी सर्वपक्षीय रॅली काढली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शरद पवार पुणे जिल्ह्यात करणार दुष्काळ दौरा

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT