Dowry System  Saam tv
महाराष्ट्र

Dowry System : लग्नात हुंडा घेणारे नामर्द; प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचं परखड मत

makarand anaspure on Dowry System : प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हुंडी पद्धतीवर टीका केली. लग्नात हुंडा घेणारे नामर्द असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Vishal Gangurde

मकरंद अनासपुरे यांनी हुंडा घेणाऱ्यांना 'नामर्द' म्हटलंय

निंबा फाटा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात अनासपुरेंकडून भाष्य

शेतकऱ्यांच्या अन्य अडचणींवर त्यांनी परखड मत मांडलं

अक्षय गवळी, साम टीव्ही

अकोला : हुंडा घेणारे नामर्द असल्याचं परखड मत मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. जर स्त्री जर टिकली नाही तर, समाज कसा टिकेल? असा सवाल त्यांनी यावेळी केलाय. ते आज अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या निंबा फाटा येथे एका सभेत बोलत होते.

निंबा फाटा येथे 'अंदुरा ऍग्रो प्रोड्युसर कंपनी'च्या वतीने 'कुणबी स्नेहमिलन सोहळा' आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतंय. या कार्यक्रमाला चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री गिरिजा ओक उपस्थित होत्या.

मराठी चित्रपट सृष्टीतील संवेदनशील अभिनेते म्हणून मकरंद अनासपुरे यांची ओळख आहे. आपल्या चित्रपटातून अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणजे मकरंद अनासपुरे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी त्यांनी आणि नाना पाटेकरांनी एकत्रित 'नाम फाउंडेशन'ची स्थापना केलीय. निंबा फाटा येथे आयोजित या कार्यक्रमात मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या अनेक मुद्द्यांवर परखड भाष्य केले.

देशात शेतकरी एकत्र आल्याशिवाय त्यांचे प्रश्न सुटणार नसल्याचं यावेळी अनासपुरे म्हटलये. याशिवाय कापूस आणि सोन्याच्या भावातील तफावतीवरही त्यांनी परखडपणे भाष्य केलंय. जर सोन्याचे भाव लाखाच्या वर गेले असतील. तर कापसाचा भाव आणखीही कमी कसा?, हा सवाल त्यांनी सरकारला केलाय.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांकडून कर वसुली करू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलंय. शेतकऱ्यांना उद्योजकांचा दर्जा का नाही? असा सवालही अनासपुरेंनी यावेळी केलाय. तर चित्रपट अभिनेत्री गिरीजा ओक यांनीही सध्याच्या शेतकऱ्यांच्या अडचणीच्या परिस्थितीत सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं असं आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aloo Chaat Recipe: संध्याकाळी नाश्त्याला खा चटपटीत आलू चाट, बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन परिसरात प्रस्तावित असलेले MICE सेंटरची निविदा अखेर रद्द

Types of Bridal Makeup: यंदा कर्तव्य आहे? मग जाणून घ्या कोण-कोणत्या प्रकारचे असतात ब्राइडल मेकअप

रहमान डकैतच्या एनकाऊंटरनंतर ल्यारीमध्ये नेमकं काय घडलं?

Aloe Vera Benefits For Skin: हिवाळ्यात चेहऱ्याला कोरफड लावण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT