मला मुख्यमंत्री करा बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो - छत्रपती संभाजीराजे विनोद जिरे
महाराष्ट्र

मला मुख्यमंत्री करा बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो - छत्रपती संभाजीराजे

बीडमध्ये मराठा आरक्षण संवाद यात्रेच्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विनोद जिरे

बीड - मराठा आरक्षणासंदर्भात ओबीसी मध्ये आरक्षण देण्याचा प्रश्न सत्तेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विचारा. मागच्या मुख्यमंत्र्यांनाही हाच प्रश्न विचारा. पालकमंत्र्यांनाही हा प्रश्न विचारायचा आणि जर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल, तर संभाजीराजेंना मुख्यमंत्री करा. असे वक्तव्य छत्रपती संभाजीराजेंनी बीडमध्ये मराठा आरक्षण जनसंवाद यात्रेत बोलताना केले आहे. Make me CM will solve all problems of Bahujans - Chhatrapati Sambhaji Raje

हे देखील पहा -

मराठा संवाद यात्रेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी थेट राजेंना प्रश्न विचारला, की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या अशी मागणी तुम्ही का करत नाहीत. त्यावेळी संभाजीराजे यांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची समजूत काढत असताना, मी ही मागणी करू शकत नाही आणि असा प्रश्न मला विचारण्यापेक्षा, तो प्रश्न राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच मागच्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना विचारा असा सल्ला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना दिला.

तेवढे जमले नाही तर संभाजी राजांना मुख्यमंत्री करा, बहुजनांचे सर्व प्रश्न सोडवतो. असे छत्रपती संभाजीराजे म्हणाले. यामुळंसंभाजीराजेंची मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा प्रगट झाली का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

बीडमध्ये संवाद यात्रेच्यावेळी संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य सरकारकडे सारथी संदर्भात व इतर काही मराठा समाजाच्या मागण्या दिल्या आहेत. त्या पूर्ण करू, असा शब्द राज्य सरकारने दिला आहे.

मात्र, त्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही, तर छत्रपतींची भूमिका बदलेल. हात वर येतील, बोट समोर येतील, कॉलर वर येईल, बटणे उघडतील, एवढेच नाही तर कपडे देखील डार्क होतील असा इशारा छत्रपती संभाजीराजेंनी राज्य सरकारला दिला आहे.

Edited By : krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT