Ladki Bahin Yojana Saam tv
महाराष्ट्र

ऐन निवडणुकीत महायुती सरकारला मोठा धक्का; लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले, कारण काय?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारला मोठा धक्का बसलाय. लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडल्याची माहिती हाती आली आहे.

Vishal Gangurde

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर-जानेवारी हप्ते रोखले आहेत

निवडणूक आयोगाने आचार संहितेचा हवाला देत हप्ते रोखलेत

15 जानेवारीला 29 महापालिकांमध्ये मतदान होत आहे

महायुती सरकारला निवडणुकीआधी मोठा धक्का बसलाय

महाराष्ट्र निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते रोखले आहेत. निवडणूक आयोगाने आचार संहितेचा हवाला देत लाडकी बहीण योजनेचे पैसे रोखलेत. मुंबईसहित २९ महापालिकेत १५ जानेवारी रोजी मतदान होणार असल्याने आयोगाने आदेश दिलेत.

लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर आणि जानेवारीचे हप्ते १४ जानेवारी रोजी देणार असल्याचा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात होता. त्याआधीच निवडणूक आयोगाने हप्ता देण्यास राज्य सकारला रोखलं. आयोगाच्या निर्णयावर महायुतीकडून कोणीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. खरंतर भाजप नेत्यांकडून मकर संक्रांतीच्या दिवशी ३००० रुपये लाडकीच्या बँक खात्यात पैसे येणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

पैसे रखडण्याचं कारण काय?

लाडकी बहीण योजनेचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास निवडणूक आयोगने मज्जाव केलाय. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना लाडकी बहीण योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल. पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक आयोगाने मज्जाव केलाय. त्याचबरोबर नवीन लाभार्थीदेखील निवडता येणार नाहीत, असेही निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

निवडणूक प्रशासनाची घरावर धाड; शिंदे गटाच्या बड्या नेत्याला हृदयविकाराचा झटका

Tuesday Horoscope : तुमचा जवळचा मित्र विश्वासघात करण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावा लागेल

दिवसभर नेटफ्लिक्स आणि जमेल तेव्हा पॉलिटीक्स; शिंदेंचा ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल|VIDEO

CM फडणवीसांकडून 'लाव रे तो व्हिडिओ' पॅटर्न; शिवतीर्थावरून ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल, VIDEO

मलाईवरुन मुंबई तापली, मुंबईत येतो, पाय छाटून दाखवा

SCROLL FOR NEXT