दसरा मेळाव्याच्या दिवशी ठाकरे गटाला मोठा धक्का
कोकणातील माजी आमदार राजन तेली शिंदे गटात प्रवेश करणार
दसरा मेळावा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा
ठाकरे गटाचा मेळावा शिवाजी पार्कवर पारंपरिक पद्धतीने आयोजित
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला सुरुवाात झाली आहे. ठाकरे गटाच्या हजारो कार्यकर्ते शिवाजी पार्कात पोहोचले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्याला महत्व प्राप्त झालंय. निवडणुकीमुळे महत्व प्राप्त झालेल्या दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. कोकणातील माजी आमदार राजन तेली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. शिंदे गटानेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाचे नेते राजन तेली हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. राजन तेली यांच्या भूमिकेमुळे ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का बसणार आहे.
राजन तेली यांचा जन्म १९७० साली कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात झाला. १९८५ साली त्यांनी कणकवली येथील महाविद्यालयातच विद्यार्थी सेनेचं प्रतिनिधित्व केलं. त्यांनी 1988 साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीमध्ये शिवसेना शाखाप्रमुखपद मिळालं. पुढे 1991 साली त्यांची शिवसेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाली.
1995 साली त्यांनी जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष म्हणून पद भूषवलं. 1997 साली त्याच्यावर कोकण सिंचन महामंडळाची उपाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली. पुढे नारायण राणे यांच्यासमवेत 2005 साली शिवसेनेला जय महाराष्ट्र करत तर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
2007 साली विधान परिषद आमदार झाले. 2012 साली सिंधुदुर्ग जिल्हा सहकरी बँकेचे चेअरमन झाले. त्यांनी 2016 साली भाजपने मोठी जबाबदारी दिली. भाजपने त्यांना राज्य सचिवपद दिलं. 2014 मध्ये झालेली विधानसभा निवडणूक दीपक केसरकर यांनी शिवसेनेकडून लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार राजन तेली यांचा पराभव केला होता. दीपक केसरकर यांना 70902 मते मिळाली. तर राजन तेली यांना 29710 मते मिळाली. 41 हजारांहून अधिक मताधिक्याने दीपक केसरकर विधानसभेवर सलग दुसऱ्यांदा निवडून गेले होते.
2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपा आणि शिवसेनेची युती होती. शिवसेना आणि भाजपची युती असताना सावंतवाडीची जागा शिवसेनेला मिळाल्याने दीपक केसरकर हे सेनेचे उमेदवार होते. यावेळी राजन तेली यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. केसकरांना 69784 मते मिळाली होती. तर राजन तेली यांना 56556 मते मिळाली. केसरकर यांना 13 हजार मतांची आघाडी मिळाली होती. सावंतवाडीतून ते सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.