Congress Leader Hemlata Patil Saam Tv
महाराष्ट्र

Nashik Congress: महापालिका निवडणुकीपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, वरिष्ठ नेत्या सोडणार पक्षाची साथ

Congress Leader Hemlata Patil: हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची फेसबुक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली. विधानसभा निवडणुकीपासून हेमलता पाटील नाराज आहेत.

Priya More

अभिजीत सोनावणे, नाशिक

महापालिका निवडणुकांपूर्वी नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्य प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत त्या पक्षाचा राजीनामा देणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर हेमलता पाटील नाराज आहेत. अनेक वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम करून देखील पक्षाकडून अन्याय झाल्यामुळे त्या नाराज आहेत.

'काँग्रेस पक्ष नेतृत्वाचं पूर्णतः दुर्लक्ष आहे. एकमेकांच्या कापाकापीतच पक्षाचे नेते मश्गूल झाले आहेत.', असा गंभीर आरोप हेमलता पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर केला आहे. हेमलता पाटील या कुठल्या पक्षात जाणार आहेत याबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने हेमलता पाटील पक्षावर नाराज होत्या. विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्यची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती.

हेमलता पाटील यांची फेसबुक पोस्ट देखील चर्चेत आली आहे. फेसबुकवर पोस्ट करून हेमलता पाटील यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पक्ष सोडण्याचे देखील पाटील यांनी संकेत दिले. भावी राजकीय वाटचालीसाठी तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा असल्याचा उल्लेख हेमलता पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.

हेमलता पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'जेंव्हा तुमची निष्ठा तुमचा प्रामाणिक पणा ही तुमची कमजोरी समजली जाते. तुम्ही ज्याला आपुलकीचा बंध समजता त्याच बंधाचा वापर तुमच्या भोवती आवळण्याचा फास म्हणून होतो तेंव्हा हा बंध झुगारणे हाच एकमेव मार्ग आहे अशा विचारा प्रती मी आता पोहचलेय. तुम्ही माझ्या विचारांशी सहमत आहात का? अपेक्षा आहे भावी राजकीय वाटचालीसाठी आपल्या अशीर्वादाची.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT