चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून दारुची वाहतूक; अवैध दारु विकण्यासाठी लढवली अनोखी शक्कल अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून दारुची वाहतूक; अवैध दारु विकण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीक अप वाहनातून टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

नाशिक : 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई नाशिकमध्ये चक्क टोमॅटोच्या कॅरेटमधून मद्याची चोरटी वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत हा प्रकार समोर आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं सापळा रचून नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) रस्त्यावर अवैध मद्याचा तब्बल 7 लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. (Major action taken by State Excise Department in Nashik)

हे देखील पहा -

महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्याचा हा साठा दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून बेकायदेशीर रित्या राज्यात विक्रीसाठी आणला जात होता. धक्कादायक बाब म्हणजे टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या पीक अप वाहनातून टोमॅटो कॅरेटमधून टोमॅटो ऐवजी चक्क अवैध मद्याची वाहतूक केली जात होती. या धडक कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागानं (State Excise Department) अवैध मद्यासह तब्बल 15 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांना अटक केली आहे.

दरम्यान दादरा नगर हवेली (Dadra Nagar Haveli) या केंद्रशासित प्रदेशातून राज्यात अवैध मद्यसाठ्याची वाहतूक केली जात असल्याचं या कारवाईवरून स्पष्ट झालं असून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता याचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nawab Malik News : मानखुर्दमध्ये नवाब मलिक यांचा पराभव | Marathi News

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Sujay Vikhe Patil : जिल्ह्यात सत्तेचा माज करणाऱ्यांचा कार्यक्रम लावला; संगमनेरमधील विजयानंतर सुजय विखे यांचा थोरातांवर निशाणा

Maharashtra Assembly Election Result: तुमचा आमदार कोण? २८८ मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी पाहा

SCROLL FOR NEXT