IPS Transfer Update  Saam tv
महाराष्ट्र

IPS Officer Transfer List : राज्यातील 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणत्या अधिकाऱ्याची कुठे बदली, यादीच आली समोर

IPS transfers Maharashtra : राज्यातील 21 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात कोणत्या अधिकाऱ्याची बदली करण्यात आली, जाणून घेऊयात.

Vishal Gangurde

मुंबई : राज्यात बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरु आहे. राज्यात आज गुरुवारी तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधीच पोलीस दलात खांदेपालट सुरु झाली आहे. पोलीस प्रशासनाच्या निर्णयाने राज्यातील काही जिल्ह्यांना नवीन पोलीस अधीक्षक मिळणार आहेत. यात धाराशिव, कोल्हापूर, रायगड सहित इतर जिल्ह्यांचा समावेश आहे.

राज्यातील पोलीस दलातील २१ पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपायुक्त पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. साताऱ्याचे पोीस अधीक्षक समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रायगड पोलीस अधीक्षकांचीही बदली करण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

रायगड पोलीस अधीक्षपदी पुण्यातील पोलीस बल गट क्रमांक १ मधील आंचल दलाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्हे यांची अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे. धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांचीही बदली करण्यात आली आहे.

धाराशीवच्या पोलीस अधीक्षकपदी सांगलीचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोतकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे आता खोतकर यांच्यापुढे जिल्ह्यातील ड्रग्स प्रकरण आणि वाढत्या गुन्हेगारीचं आव्हान असणार आहे. संजय जाधव यांना नवीन नेमणूक मिळालेली नाही. त्यामुळे त्यांना कुठे नियुक्ती मिळणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

IPS

दरम्यान, बीड जिल्ह्यातील पोलीस दलातही बदल्या करण्यात आल्या आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवीन कावंत यांनी पोलिसांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्याील एकूण ६०६ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ips

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT