Mahesh Arvind Ghatule Saam Tv
महाराष्ट्र

MPSC Success Story: पहिलाच प्रयत्न,राज्यात प्रथम; धाराशिवच्या सुपुत्राची भरारी, 29 व्या वर्षी झाला उपजिल्हाधिकारी

MPSC News: धाराशिव जिल्ह्यातील डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी लोकसेवा आयोगाच्या निकालात पहिल्याच प्रयत्नांत राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे.

Saam Tv

बालाजी सुरवसे, साम टीव्ही, प्रतिनिधी

जिद्द, चिकाटीच्या बळावर धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घारगाव येथील डॉ. महेश अरविंद घाटुळे यांनी गुरुवारी लागलेल्या लोकसेवा आयोगाच्या निकालात पहिल्याच प्रयत्नांत राज्यात पहिला क्रमांक मिळवत उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे.

कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य, वेळेचं अचुक नियोजन व महत्वकांक्षा अनेकांना स्पर्धात्मक परिक्षेत यश देते. तालुक्यातील घारगावचे अरविंद घाटुळे हे आपेगावच्या (ता. अंबाजोगाई जि. बीड) जयकिसान विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत. त्यांचा महेश हा मुलगा लहानपणापासूनच अभ्यासात हुशार. चांगले शिक्षण घ्यायचं, सातत्यपूर्ण अभ्यास करायचा अन् चांगल्या हुद्यावर जायचं, असा त्यांचा ध्यास.

या होतकरू महेशनी प्राथमीक शिक्षण गावात, माध्यमिक अंबेजोगाईच्या गुरुदेव विद्यालयात तर उच्च माध्यमिक तेथीलच योगेश्वरी महाविद्यालयात पुर्ण केले. पुढे नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर तेथेच आंतरवासीता सेवा केली.

पुढे वडिलांच्या इच्छेनुसार 'एमडी' करण्यासाठी पुणे गाठले. मात्र, ते न करता स्पर्धा परिक्षेच्या तयारीचा मार्ग धरत गाव गाठले. पुढं लॉकडाऊन पडल्यानंतरही महेश यांनी सातत्य कायम ठेवत अभ्यास केला. आयोगाची २०२३ मध्ये जाहीरात निघाल्यानंतर अर्ज करत केला अन् आजअखेर यशाला गवसणी घातली.

पहिलाच प्रयत्न, राज्यात प्रथम...

घारगावच्या अवघ्या २९ वर्षीय महेश घाटुळे यांनी २०२३ मध्ये पुर्व, मुख्य व तद्नंतर यंदा मुख्य परिक्षेत सलग यश मिळवलं ते पण पहिल्याच प्रयत्नात. त्याच्या यशात वडील अरविंद, आई मिरा घाटुळे व विवाहीत बहिण मंजूषा आदींचे मोठे बळ आहे.

एमडी होण्यासाठी ४० हजार दिले, त्यांनी स्पर्धा परिक्षेची पुस्तक आणले...

एमपीएससीत ५९४ गूण घेत राज्यात प्रथम येत उपजिल्हाधिकारी या हुद्द्याला गवसणी घालणार्या घारगावच्या महेश घाटुळे यांना वडीलांनी पुण्यात 'एमडी' करण्यासाठी ४० हजार देत पाठवले. यातून स्पर्धा परिक्षेची पुस्तकं घेवून महेश यांनी एमपीएससी करण्यासाठी गाव गाठलं. अधुनमधुन मार्गदर्शन अन् फक्त इन्टरव्युहला क्लास लावल्याचे वडील अरविंद घाटुळे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१७ व्या वर्षी वेश्याव्यवसाय, दुबईच्या बारमध्ये नाचली; दिग्दर्शकामुळे झाली बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Shah rukh Khan: रिटायरमेंटचा सल्ला दिला, किंग खानने दिलं असं झणझणीत उत्तर की ट्रोलरची बोलतीच बंद!

Maharashtra Live News Update: विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी आज अमरावतीत

Duplicate Voter: एका मतदाराचं नाव दोन-दोन ठिकाणी कशी? मृतांचा आकडा वाढला कसा? आयोगानं सांगितली कारणं

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT