Protest Against Jitedra Awhad  Saam Tv
महाराष्ट्र

Jitedra Awhad: फोटो जाळले, जोडे मारले; जितेंद्र आव्हाडांविरोधात महायुती आक्रमक, हजारो कार्यकर्ते रस्त्यावर

Rohini Gudaghe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्यामुळे त्यांच्याविरोधात भाजपकडून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे. महाड येथील मनुस्मृतीविरोधातील आंदोलनात जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला होता. याप्रकरणी गुन्हा देखील दाखल केला गेला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ राज्यात विविध ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

राज्यभरात जितेंद्र आव्हाड (Protest Against Jitedra Awhad) यांच्या विरोधात महायुतीचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळत आहे. सोलापुरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आव्हाडांविरोधात विरोधात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या पोस्टरला जोडे मारत आणि त्यांचं पोस्टर फाडून महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सोलापूरात महायुतीने केली आहे.

लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतीकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. काल महाड येथे जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडलेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली (Jitedra Awhad Tearing Dr Babasaheb Ambedkars Photo) आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज सकाळी पिंपरी चिंचवड शहरात जोडे मारो आंदोलन केलं आहे.

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रणाची विटंबना केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायदा आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी (Mahayuti Protest) केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याच्या निषेधार्थ आज धुळ्यात भाजप कार्यालय येथे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे. यावेळी जितेंद्र आव्हाड यांची प्रतिमा श्वानाच्या गळ्यात बांधून त्याचबरोबर त्यांची प्रतिमा जाळून आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे.

जळगावमध्ये भाजपाच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitedra Awhad News) प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आहे. शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. जळगावमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला भाजपने जोडे मारो आंदोलन केलं आहे. आव्हाड यांनी चवदार ताळ्यावर जाऊन आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं छायाचित्र फाडलं. या घटनेचा निषेध संपूर्ण राज्यभर केला जात आहे.

नांदेडमध्ये आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजपने जोडे मारो आंदोलन केलं आहे. नांदेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवी मुंबईत देखील भाजपने निषेध आंदोलन आंदोलन केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नागपुरात भाजपच्या वतीने आज संविधान चौकात निषेध नोंदवत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. ठाण्यात देखील आंदोलन केलं गेलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT