Maharashtra Chief Minister  
महाराष्ट्र

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? महायुतीत रस्सीखेच; भाजप,राष्ट्रवादी अन् शिवसेनेकडून वेगवेगळे दावे!

Maharashtra Vidhan Sabha Election Results : महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार? स्पष्ट बहुमत आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरु झाली.

Namdeo Kumbhar

Mahayuti Next CM Candidate in Maharashtra : महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार आहे, शपथविधीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. २५ नोव्हेंबर रोजी वानखेडे मैदानावर भव्य शपथविधी होणार आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाकडून मंत्रिपद आणि मुख्यमंत्रिपद यावर चर्चा सुरु आहे. शपथविधीची तयारी पूर्ण होत आली, पण मुख्यमंत्री कोण होणार? हे मात्र अस्पष्ट आहे. प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जात आहेत.

महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्रि‍पदावर दावा केला आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु आहे का? याची जोरदार चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीस यांना भाजप पुन्हा मुख्यमंत्री करणार की अजित पवार यांची वर्णी लागणार? याची चर्चा सुरु आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्याची आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसेना नेते करणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही अल्याचं समोर आलेय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय झाल्यानंतर त्यांच्या ठाण्याच्या घराच्या बाहेर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री असे बॅनर लागले. त्यांच्या पत्नी शिंदे यांनाही एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे.

सुनील तटकरे यांनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केला. कार्यकर्त्याची अपेक्षा आहे मात्र अंतिम निर्णय भाजपचे नेते घेतील, असे तटकरे म्हणाले.

अजित पवार गटाच्या महिला प्रदेश अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनीही अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असा विश्वास व्यक्त केला.

दादा मुख्यमंत्री व्हावे हे माझं स्वप्न आहे, असे सुरेखा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. त्याशिवाय सुरज चव्हाण यांनाही दादा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा असल्याचे सांगितले.

पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याशिवाय भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,अशी इच्छा व्यक्त केली. महायुतीच्या राज्यातील विजयानंतर पुण्यात फडणवीस यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख असणारे बॅनर झळकले.

मिरा भाईंदर विधानसभेवर निवडून गेलेले नवनिर्वाचित आमदार नरेंद्र मेहता यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diljit Dosanjh Concert: गायक दिलजीत दोसांझचा पुण्यात म्युझिक कॉन्सर्ट, चंद्रकांत पाटील यांचा विरोध; कारण काय?

Vinod Nikole News : पालघर डहाणूवर पुन्हा फडकला लाल झेंडा, सीपीएमचे विनोद निकोले पुन्हा झाले आमदार

Aheri Election result 2024 : अहेरीत बाप विरूद्ध मुलगी लढत, धर्मरावबाबा अत्राम यांनी केला मुलीचा पराभव

IPL 2025 Mega Auction Live: आयपीएल लिलावाला सुरुवात! कोण होणार मालामाल?

Virat Kohli Century: शतकांचा दुष्काळ संपला! 'विराट' शतकासह किंग कोहलीने रचला इतिहास; डॉन ब्रॅडमनला सोडलं मागे

SCROLL FOR NEXT