अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
महायुतीचा खातेवाटपाचा आज पेच सुटला. महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या भेटीत महायुतीच्या नेत्यांनी सत्तास्थापनेचा दावा केला. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेबाबत दावा केल्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक वर्षा बंगल्यावर पार पडणार आहे. यात सर्व मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे आता उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. दरम्यान त्यापूर्वी आज महायुतीचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. यानंतर महायुतीची एक पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी शिंदेंचे आभार मानले. एकनाथ शिंदेंनी मला मुख्यमंत्री करावा, असे पत्र राज्यपालांना दिलं.
अजित पवार यांनीही त्याच आशयाचे पत्र देऊन मुख्यमंत्री म्हणून माझ्यासाठी पत्र दिले. देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे राहतील का नाही याबाबत सस्पेन्स अद्याप मिटू शकलेला नाहीये. पत्रकार परिषदेत बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंचे आभार मानत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याची विनंती केली.
एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये राहण्यासंदर्भात सकारात्मक राहतील राहतील असं फडवणीस म्हणाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत. मात्र आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतो. शिवसेनेच्या वतीने एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं. त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल, असं फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.