Senior Mahayuti leaders addressing concerns over government performance during the Maharashtra Assembly session. saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महायुतीमध्ये पुन्हा नाराजीचा सूर, सुधीर मुंगटीवारांसह सत्तेतील आमदार सरकारच्या कामावर नाखूश

Mahayuti Internal Dispute : सुधीर मुनगंटीवार यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी सरकारी कामकाज आणि एफडीएच्या कारभारावर असमाधान व्यक्त केलंय. महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

Bharat Jadhav

  • महायुती सरकारमध्ये आमदारांची उघड नाराजी

  • नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनीही नाराजी व्यक्त केली.

  • सत्ताधारी महायुतीमध्ये अंतर्गत मतभेद वाढला.

गेल्या तीन अधिवेशनांपासून राज्यांमध्ये विरोधी पक्षनेता नेमला जात नसल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुती सरकारवर टीका केली जातेय. त्याचवेळी आता महायुतीमधील आमदार सरकारच्या कारभारावर नाखूश आहेत. सरकारलाच घरचा आहेर देत आहेत. माजी मंत्री ज्येष्ठ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि नरहरी झिरवाळ यांनी एफडीएच्या कामकाजावर काल जाहीर नाराज व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनीही आपली नाराजी बोलून दाखवलीय.

बहुजन समाज,अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीय समाजाच्या प्रश्नांना सभागृह कामकाजात स्थान दिले जात नसल्यानं ते सरकारवर नाराज आहेत. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. कामकाजामध्ये सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभाग, बहुजन कल्याण विभाग व दिव्यांग कल्याण विभाग यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रश्नांना स्थान देण्यात आलं नाहीये.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले व छत्रपती शाहू महाराजांनी शोषीत वंचित आणि बहुजन समाज हक्कांसाठी जे विचार मांडले त्यानुसार या समाजाशी निगडित प्रश्नांना सभागृहाच्या कामकाजात स्थान मिळणे अत्यावश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आदिवासी व बहुजन समाज यांच्याशी संबंधित अनेक प्रश्न विविध आमदारांनी नियमानुसार दाखल केले असूनही त्या प्रश्नांना कामकाजात स्थान देण्यात आले नाही. ही अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचं राजकुमार बडोले यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलंय.

त्यामुळे महायुती सरकारच्या कारभारावर आमदार असमाधानी, आहेत असं चित्र दिसून येत आहे. एफडीएच्या कामकाज पद्धतीवर सत्ताधारी भाजपच्या आमदारांनीही सडकून टीका केली होती. भर सभागृहामध्ये आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी एफडीएच्या कामकाजावरून कान टोचले होते. राज्यामध्ये कप सिरपमुळे २५ बालकांचे मृत्यू झाला होता. या मृत्यूकडे विक्रमसिंह पाचपुते लक्ष वेधले.

नरहरी झिरवळ यांनीही एफडीएच्या ढिसाळ कारभाराची कबुली दिली. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांना निशाणा साधला. बिंदू नामावलीवरूनही सुधीर मुनगंटीवार यांनी हल्लाबोल केला होता. अजित पवार यांनी २०० कोटीची घोषणा करण्यात आली. मात्र फक्त ३० कोटी देण्यात आले. त्यामुळे शासन गंभीर नसल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. शब्द दिले जातात. मात्र, पैसे मात्र दिले जात नाहीत, असं मुनंगटीवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

SCROLL FOR NEXT