Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : महायुतीत अजित पवार नकोसे? भाजप-शिंदे गटाकडून दादा टार्गेट? वाचा...

Ajit Pawar : शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांनी राष्ट्रवादीबाबत केलेल्या विधानामुळे महायुतीतील वातावरण तापलेलं असतानाच आता भाजप प्रवक्त्याने देखील राष्ट्रवादीबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यामुळे महायुतीत अजित पवार व्हिलन ठरतायत का असा सवाल उपस्थित झालायं...

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापल्याचं चित्र आहे. अशातच महायुतीत सारं काही अलबेल आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होतो. त्याला कारण ठरलंय सातत्यानं अजित पवारांवर होणारी टीका. नुकतेच शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते तानाजी सावंतांनी अजित पवारांबाबत एक वक्तव्य केलं होतं.

हे प्रकरण मिटत नाही तोच आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाकेंनी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाबाबत आक्षेप घेतलाय. त्यामुळे अजित पवार महायुतीतले व्हिलन ठरतायत का? असा सवाल उपस्थित होतोय. गेल्या काही दिवसांत अजित पवारांविरोधात शिंदे गट आणि भाजपनं नेत्यांनी अनेक वक्तव्य केली आहेत.

महायुतीतले 'दादा' व्हिलन ?

लोकसभा निवडणुकीआधी अजित पवारांनी भाजप-शिंदेंसोबत घरोबा केला. लोकसभेत महायुतीला याचा म्हणावा तसा फायदा झाला नाही. उलटपक्षी भाजपने सपाटून मार खाल्ला. यानंतर भाजपची मातृसंस्था असलेल्या संघानं अजित पवारांवर चांगलंच तोंडसुख घेतलं. अजित पवारांच्या प्रवेशानं भाजपला फटका बसल्याचा सूर संघ समविचारी मासिकांमधून आळवण्यात आला. त्यानंतर सातत्यानं कधी शिंदे गट तर कधी भाजपमधून अजित पवारांना टार्गेट केलं जातंय. याआधी रामदास कदमांनी जाहीर भाषणात अजित पवारांना लक्ष्य केलं होतं. रामदास कदम म्हणाले होते की, अजितदादा थोडे उशिरा आले असते तर

दरम्यान,अजित पवारांना लक्ष्य करायचं आणि तिसरी आघाडी स्थापन करुन मतांचं विभाजन करण्याचा डाव महायुती आखत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगतायत. दरम्यान अजित पवारांनी या चर्चांना मी फार महत्त्व देत नसल्याचं म्हटलंय.

अजित पवारांवर सातत्यानं टीका केली जातेय. विधानसभेला अद्याप वेळ आहे. अशात महायुतीत जागावाटपाच्या चर्चेलाही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे नाराजीला नक्कीच वाव आहे. त्यामुळे अजित दादा महायुतीचा धर्म पाळणार की, बाहेरची वाट धरणार हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dehydration despite drinking water: 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशनचा त्रास होतोय? वाचा काय आहेत यामागची कारणं

Snake Fact: नाग आणि नागीणमध्ये फरक काय? कसा ओळखायचा?

Bread Pizza Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ब्रेड पिझ्झा, सोप्या पद्धतीने तयार करा मजेशीर स्नॅक

iPhone 17 Pro: 'या' ५ देशांमध्ये Apple iPhone 17 Pro स्वस्तात मिळणार, ₹37,424 होईल बचत

Ratnagiri Tourism: रत्नागिरीपासून अवघ्या पाऊण तासाच्या अंतरावर वसलंय स्वर्गाहून सुंदर ठिकाण; निळाशार समुद्र, सोनेरी वाळू अन् लपलेलं पर्यटन रत्न

SCROLL FOR NEXT